बीड, 16 डिसेंबर : हल्ली लहान मुलांमध्येही मोबाईल वापराचं प्रमाण वाढलं आहे. पब्जीने तर सर्वांनाच वेड लावलं आहे. पब्जीच्या नादात मुलं काय काय करतात याबाबत बरीच प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पब्जी गेमच्या व्यसनामधून 15 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली. कृष्णा परमेश्वर साळवे, असे मृत मुलाचे नाव आहे. कृष्णाने पब्जी या गेमच्या व्यसनातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कृष्णा परमेश्वर साळवे यांचे वडील ऊसतोडणीला गेल्यामुळे कृष्णा आणि आई दोघेच घरी होते. तीन दिवसांपूर्वी तो शाळेच्या सहलीला गेला होता. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो घरी परतला.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याची आई बाहेर गेल्याचे समजले. त्यानंतर सकाळी 10 वाजेच्या सुमारास कृष्णाने दरवाज्याला आतून कडी लावून घेत कपड्याच्या चिंध्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड
जर तुमचा मुलगा ऑनलाइन गेम (Online Game) खेळतो किंवा त्याचा अधिकतर वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात जात असेल तर पालकांनी याबाबत अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण ही सवय तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे पालकांनी जागृत राहण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, Crime news, Pubg game