जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे काही वेळा एखाद्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

  • -MIN READ Trending Desk Bilaspur,Chhattisgarh
  • Last Updated :

    बिलासपूर, 16 डिसेंबर : छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूरमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे घडताहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्याच्या हत्येबाबत अजून धागेदोरे मिळाले नसले, तरी तोपर्यंत आणखी एक हत्या झाली आहे. या गुन्ह्यातल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शाळकरी मुलीवर प्रेम करणाऱ्या एका प्रेमवीराने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या केली. पोलिसांनी लगेचच त्यामागच्या सूत्रधाराला शोधून त्याला अटकही केली. ‘आज तक’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं -  प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे काही वेळा एखाद्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूरमधल्या तारबहार भागात घडली. प्रेमिकेला भेटू न दिल्यामुळे माथेफिरू इसमाने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा जीव घेतला. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक असलेले प्रदीप श्रीवास्तव (52) ऊर्फ दीपक लिंक रोडच्या देवेंदर गल्लीमध्ये राहत होते. पचपेडीच्या सरकारी शाळेत ते मुख्याध्यापक होते. रात्री घराचा दरवाजा उघडल्याची चाहूल लागल्याने त्यांची पत्नी अनिताने बाहेर येऊन पाहिलं, तर प्रदीप श्रीवास्तव रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. डोक्यातून भरपूर रक्तस्राव झाला होता. ते दृष्य पाहून पत्नीने आरडाओरडा केला व शेजाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. दरम्यान, मुख्याध्यापक प्रदीप श्रीवास्तव यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी या घटनेची तत्काळ चौकशी सुरु केली. मुख्याध्यापकांच्या घराच्या कॉलनीमध्ये तपास केला असता एक तरुण फिरताना आढळला. त्याने स्वतःचं नाव उपेंद्र कौशिक असं सांगितलं. सिरगिट्टी ठाणे भागातल्या हरदीकला इथला रहिवासी असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने मुख्याध्यापक प्रदीप श्रीवास्तव यांची हत्या केल्याचं कबूल केलं. गर्लफ्रेंडला मुख्याध्यापक त्रास देत होते, म्हणून त्यांना मारल्याचं त्यानं सांगितलं. मुख्याध्यापक त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटू देत नसत. तसंच शाळेच्या जवळपासही फिरण्यास त्याला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे त्या इसमाने मुख्याध्यापकांची हत्या केली. हेही वाचा -  हिंदू मुलीवर बलात्कार, विवाहित मुस्लिम तरुण फरार, जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली जात असल्याचं बिलासपूरचे पोलीस अधीक्षक संदीप कुमार यांनी सांगितलं. शाळेतल्या मुलीला भेटण्यापासून मुख्याध्यापक त्या तरुणाला मनाई करत होते. त्यामुळे त्यानं त्यांची हत्या केली. काही दिवसांपूर्वी बिलासपूरमध्ये दिवसाढवळ्या एका काँग्रेस नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येमागचं कोडं अजून पोलिसांना उलडगलेलं नाही; मात्र या घटनेमध्ये पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे बिलासपूरमधलं वातावरण ढवळून निघालं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात