नवी दिल्ली, 19 मे : प्रत्येक पालकांना आपली मुले निरोगी असावीत, असे वाटते. मात्र, अनेक वेळा आहाराकडे लक्ष न दिल्याचा परिणाम मुलांच्या वजनावर पडतो आणि त्यामुळे आजार होण्याचा धोका अनेक प्रकारे वाढतो. एका संशोधनात असं समोर आलं आहे की, जी मुले खूप लठ्ठ असतात त्यांना वयाच्या 6 वर्षानंतर अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं. मुलांवर केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, ज्या मुलांचे वजन जास्त आहे त्यांच्यात वयाच्या 6 वर्षापासून कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेहाशी संबंधित लक्षणे दिसून (Childran Health Tips) येतात.
अभ्यासातून काय समजलं -
आज तकने दिलेल्या बातमीनुसार, अभ्यासासाठी, डॅनिश संशोधकांनी 2 ते 8 वर्षे वयोगटातील सुमारे एक हजार मुलांचे निरीक्षण केले. या सर्व मुलांची रक्त तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये लठ्ठ मुलांच्या तुलनेत प्री-स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये फारसा धोका आढळला नाही. त्याच वेळी, जेव्हा ही चाचणी 6 वर्षांच्या मुलांसाठी केली गेली तेव्हा जास्त वजन आणि सडपातळ मुलांमध्ये हा फरक स्पष्टपणे दिसून आला. कोपनहेगन विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. क्रिस्टीन फ्रिथिओफ-बोज्से यांनी सांगितले की, 'बालपणी जास्त वजन असलेल्या मुलांना भविष्यात हृदय आणि यकृत रोग, टाइप 2 मधुमेह आणि चयापचय यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
हे वाचा -
शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार
संशोधकांचे म्हणणे आहे की, लहानपणी ज्या मुलांचे वजन जास्त असते, ते मोठे होऊन लठ्ठ होतात. जास्त लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदय आणि यकृताशी संबंधित आजार आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. निरोगी वजन आणि लठ्ठपणा यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य उपचाराने मुलांना भविष्यात या सर्व आजारांपासून वाचवता येऊ शकते.
हे वाचा -
Horoscope : मानसिक तयारी ठेवा! आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याचा होणार THE END
लठ्ठपणापासून मुलांना कसे वाचवावे-
मुलांना लठ्ठपणापासून वाचवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. ते म्हणतात की मुले त्यांच्या पालकांच्या गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला मुलाचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर जंक फूडचे सेवन स्वतः टाळा. मुलांना दररोज 60 मिनिटे शारीरिक हालचाली करण्यास प्रोत्साहित करा. मुलाला त्याच्या वयानुसार आहार द्या. त्यांच्या आहारात सकस गोष्टींचा समावेश करा. मुलांना फोन स्क्रीनपासून दूर ठेवा आणि पुरेशी झोप घ्यायला लावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.