Beed News: कोविड सेंटरमधून बाहेर पडणे रुग्णांना पडले महागात, अखेर गुन्हा दाखल

Beed News: कोविड सेंटरमधून बाहेर पडणे रुग्णांना पडले महागात, अखेर गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट खाद्यपदार्थ खरेदीसाठी रस्त्यावर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.

  • Share this:

बीड, 04 मे: बीड जिल्ह्यातील वडवणी येथील कोविड सेंटरमधून (covid center) खुशालपणे बाहेर पडून मोकाट फिरणे कोरोनाबाधित (Corona-infected patients) रुग्णांना चांगलेच महागात पडले आहे. फळं, खाद्यपदार्थ घेण्यासाठी बाहेर फिरणाऱ्या 4 कोरोनाबाधित रुग्णांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटरमध्ये हा प्रकार समोर आला होता. काही कोरोनाबाधित रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार पाहण्यास मिळाला. स्थानिक तरुणांनी या रुग्णांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद केला. तरुणांनी या रुग्णांना हटकले असता 'खाण्याचे पदार्थ घेण्यासाठी बाहेर आलो' अशी उत्तर देऊन थेट कोविड सेंटर गाठले. धक्कादायक म्हणजे, या बाधितांनी तोंडावर साधे मास्क सुद्धा लावले नव्हते.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट खाद्यपदार्थ खरेदीसाठी रस्त्यावर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.  वारंवार सूचना करूनही कोरोना रुग्ण कोविड सेंटरच्या बाहेर पडत आहे. कोविड सेंटर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता.

कोरोना टेस्ट निगेटिव्ह पण लक्षणं दिसत असतील, तर काय करावं?

अखेर या प्रकरणी प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले रस्त्यावर, बाजारात मोकाट फिरणाऱ्या कोरोनाबाधित 4 रुग्णांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री कोविड सेंटरचे सामूदाय अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोरोनाबधित व्यक्तींचा खुलेआम वावर यामुळे वडवणीत भीतीच वातावरण होते.

विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करून दंड वसुली

दरम्यान, मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक  आर राजा स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोकाट फिरणारे कमी नाहीत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याची ऑंटीजण टेस्ट केली जात असून पॉझिटिव्ह आढळता क्षणी कोविडं सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे तर निगेटिव्ह आढळला तर 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे देखील आवाहन केले.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 8:56 AM IST

ताज्या बातम्या