कोरोना टेस्ट निगेटिव्ह पण लक्षणं दिसत असतील, तर काय करावं?

कोरोना टेस्ट निगेटिव्ह पण लक्षणं दिसत असतील, तर काय करावं?

बहुतेक कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्यातील काही लक्षणं कायम राहत आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 मे : गेलं वर्षभर कोरोना महासाथीमुळे (Coronavirus) भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. त्यात काही चुकीची माहितीही वणव्यासारखी पसरत आहे. कोरोनाबाबत अजूनही लोकांच्या मनात प्रश्न आहे. शिवाय शास्त्रज्ञही यावर अद्याप अभ्यास करत आहेत. कोरोनाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. दररोज काही ना काही नवीन दिसून येतं. कोरोनाबाबत दिसून आलेली एक बाब म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली तरी कोरोनाची लक्षणं दिसतात.

कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल पण कोरोनाची लक्षणं असतील तर काय करावं? आणि कोरोनाबाबत तुमच्या मनातील अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली आहेत. सुरतमधल्या सरकारी मेडिकल कॉलेजमधल्या रेस्पिरेटरी मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. पारुल वदगामा (Dr Parul Vadgama). त्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गुजरात राज्य शाखेच्या उपाध्यक्षा आहेत.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू कधी असेल?

प्रत्येक शहरात संसर्गाची सर्वोच्च पातळी वेगवेगळ्या वेळी अनुभवायला मिळेल. देशाचा सरासरी विचार केला, तर मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सर्वोच्च पातळी गाठली जाईल. जूनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्याची अपेक्षा आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत.

देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला आणखी ऑक्सिजनचा पुरवठा लागणार आहे. मात्र तो आपल्यापर्यंत येईपर्यंत डॉक्टर म्हणून आम्ही आहे तो ऑक्सिजन सर्वोत्तम प्रकारे कसा वापरता येईल, याचा आमच्या पातळीवर प्रयत्न करत आहोत. सुरत मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही काही उपाययोजना करत आहोत. रुग्णाची ऑक्सिजन पातळी 92 टक्क्यांच्या वर जाण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. रुग्णाला ऑक्सिजन देताना छोट्या प्रमाणात लिकेज होतं. ते टाळण्यासाठी बायोमेडिकल टीम तैनात करून ऑक्सिजन ऑडिट समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर, नर्स आणि बायोमेडिकल इंजिनीअरचा समावेश असतो. ही टीम लिकेजपासून त्यावर तातडीने उपाययोजना करते.

हे वाचा - दिलासादायक! Corona संसर्गाच प्रमाण घटलं, तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

रुग्ण जेवत असताना किंवा तो वॉशरूमला गेलेला असताना त्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून ठेवायला आम्ही सुरुवात केली आहे. रुग्णाची तब्येत सुधारायला लागली आणि धोकादायक स्थितीतून बाहेर आला, कीआम्ही ऑक्सिजन सिलिंडरवरचं त्याचं अवलंबित्व कमी करतो .5-7 लीटर्स ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांकरिता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा (Oxygen Concentrator) वापर केला जातो. व्हेंटिपिप नावाचं छोटं उपकरणही आम्ही वापरतो. हा व्हेंटिलेटर नव्हे, पण रुग्णाला दाबाने ऑक्सिजन देण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. रुग्णाच्या फुप्फुसांच्या पेशी उघडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे ज्या रुग्णांना दर मिनिटाला 15 लीटर ऑक्सिजन लागत होता, त्यांना आता 10 लीटरच ऑक्सिजन लागतो. त्यामुळे कमी ऑक्सिजन अधिक प्रभावीपणे वापरता येऊ लागला आहे. या छोट्या छोट्या उपायांतून आम्ही दिवसाला 7-8 मेट्रिक टन ऑक्सिजनची बचत करू शकतो आहोत, जो अन्य 100 रुग्णांची प्रकृती स्थिर करण्यासाठी वापरता येऊ शकतो.

महाराष्ट्रात जुलै-ऑगस्टमध्ये खरंच तिसरी लाट (Third Wave) येणं अपेक्षित आहे का? तिच्याशी कसा सामना करायचा?

मला वाटतं की महाराष्ट्रात तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दिसू शकेल. पण आपल्याला आत्तापासूनच त्या दृष्टीने काम करायला पाहिजे. वाईट दिवसांतून शिकलं पाहिजे. आरोग्य यंत्रणेतल्या पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. आपल्याला निश्चितच आणखी ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर्स यांची गरज भासणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज भासेल. नर्सिंगचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना बाय-पॅप, व्हेंटिलेटर सेटअप, ऑक्सिजन सिलेंडर सेटिंग अशा कामांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. कोविड एवढ्यात जाणार नाही. त्यामुळे अधिकाधिक रुग्णसंख्या लक्षात घेऊन अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आपल्याला लागणार आहे.

जेव्हा रुग्णाचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह येतात आणि तरीही लक्षणं दिसत असतात, तेव्हा नेमकं काय होतं?

-ताप, अंगदुखी, कफ अशी सौम्य लक्षणं असली तरी स्वतःला विलग करा आणि लक्षणं कमी होण्यासाठी औषधं घ्या. पाणी प्या. ऑक्सिजन पातळी तपासत राहा. तुमची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, तुमची ऑक्सिजन पातळी घटली, तर तातडीने डॉक्टरांशी चर्चा करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये जा.

कोविड-19 मधून (Covdi19) बऱ्या झालेल्या व्यक्तीने त्याच्या अवयवांचं कार्य तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

-कोणत्याही फॉलो-अप टेस्ट्सची आम्ही शिफारस करत नाही. 35ते40टक्केफुप्फुसांना गंभीर न्यूमोनिया (Pneumonia)असेल,तर छातीचा सीटी स्कॅन आणिपल्मोनरी फंक्शन टेस्ट महिन्याभरानंतर करण्याचा सल्ला दिला जातो.

हे वाचा - कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला

ट्रीटमेंटच्या अखेरीस आम्ही सीआरपी,डी-डिमर,आयएल-सिक्स आदी मार्कर्स तपासतो जेणेकरून काही लक्षणं शिल्लक राहिली असली, तर लक्षात यावीत आणि सेकंडरी इन्फेक्शन झालंय का याचाही अंदाज यावा.

लिव्हर सिऱ्हॉसिस (Liver Cirrhosis) असलेल्यांवर लशीचा विपरीत परिणाम होतो का?

-तुमची लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल असेल,तसंच अलीकडे लिव्हरला कोणतंहीइन्फेक्शन किंवा दाह झाला नसेल,तर तुम्ही कोविड लस घेऊ शकता.

ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) घटली आणि तातडीने हॉस्पिटलला जाणं शक्य नसेल, तर पहिली गोष्ट कोणती केली पाहिजे?

ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या खाली आली,तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या सहाय्याने रुग्णाला स्थिर करण्याचा प्रयत्न करता येईल. ऑक्सिजन पुरवठा असलेल्या कोणत्याही उपचारस्थळी नेलं तरी चालेल.

माझी ऑक्सिजन पातळी (SPO2) नॉर्मल आहे. पण मला श्वास कोंडल्यासारखं होतंय,तर मी काय करू? 14 दिवसांपूर्वी मी कोविड पॉझिटिव्ह (Covid Positive) आलो असून,गेले पाच दिवस ताप नाही.

या स्थितीत श्वास कोंडल्यासारखं वाटत असेल,तरडॉक्टरांचा सल्ला घ्या. दुसऱ्या ऑक्सिमीटरचा वापर करून पुन्हा ऑक्सिजन पातळी तपासावी. रेस्पिरेशन रेट तपासावा. त्यासाठी सरळ आडवे पडा. पोटावर हात ठेवून एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते मोजा. एका मिनिटात 20 श्वासांपेक्षा अधिक वेळा श्वास घेतला जात असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

First published: May 3, 2021, 11:44 PM IST

ताज्या बातम्या