वसई, 4 नोव्हेंबर: 18 वर्षीय तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असून ती त्याच्यासोबत फिरायला गेली, या रागातून आई-वडिलांनी पोटच्या मुलीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. वसईतील सुरुच्या बागेतील झुडपात नेऊन मुलीचा ओढणीनं गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही तरुणी गळा आवळताना बेशुद्ध झाल्यानं तिचा जीव थोडक्यात बचावला. हेही वाचा.. पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका मिळालेली माहिती अशी की, स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यावर पोलिसांना बोलावून जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तरुणीच्या जबाबावरून वसई पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. काय आहे प्रकरण? वसई पूर्वेकडील वालीव गावातील नवजीवन नाका येथे राहणाऱ्या मुस्कान विनोद कश्यप (18) हिचे आझाद नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुस्कान ही आझादसोबत फिरण्यासाठी गेली होती. तिला तिच्या भावाच्या मित्राने पाहिलं होतं. नंतर मुस्कानचा भाऊ सनी यानं याबाबत आई रेणू आणि वडील विनोद कश्यप यांना सांगितलं. आई, वडील आणि भावानं आपल्या मुलीला समजूत काढली. मात्र, मुस्कान ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. आई, वडील आणि भावानं रागाच्या भरात मुस्कान हिला रविवारी दुपारी रिक्षात बसवून सुरुची बागेत घेऊन गेले. समुद्र किनाऱ्यावरील झाडाझुडुपांच्या ठिकाणी पोहोचल्यावर कोणी नसल्याचे पाहून तिघांनी तिला बेदम मारहाण केली. भाऊ सनी याने तिच्या गळ्यातील काळ्या ओढणीच्या साहाय्याने गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने स्थानिकांनी पाहिल्यावर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन जखमी तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केलं. वसई पोलिसांनी तरुणीच्या जबाबनंतर गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हेही वाचा.. 4 वर्षांच्या चिमुकल्यानं मृत्यूला दिला हुल ,91तासांनंतर ढिगाऱ्याखालून जिवंत काढल मुस्कानला ठाण्याला हलवलं.. दरम्यान, जखमी मुस्कानला बोलण्यासाठी, पाणी पिण्यासाठी त्रास होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिन्ही आरोपींना वसई कोर्टात हजर केलं असता सगळ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.