पुणे, 28 एप्रिल : बारसू रिफायनरीचा वाद आणखी चिघळला आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराचा वापरही करावा लागला. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला, असा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाकडून प्रकल्पाला विरोध होत आहे. बारसू प्रकल्पावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ती जागा ठरवण्यात आली होती, पण स्थानिकांचा विरोध का आहे? मी काल उदय सामंत यांच्यासोबत बोललो. स्थानिकांचा विरोध का आहे? ते तपासलं पाहिजे. या प्रकल्पात नोकऱ्या मिळणार आहेत, काही राजकीय पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत, असं अजित पवार म्हणाले. बारसू पुन्हा पेटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ‘तिथल्या लोकांचे व्यवसाय अडचणीत येऊ शकतात म्हणून विरोध आहे का? का इतर कारणं आहेत ते बघायला हवं. लाखो लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. परिसराचं कायमचं नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा, पण त्यातून जर फायदा होणार असेल, तर त्याचा विचार करायला हवा. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल, त्या ठिकाणी असलेल्या जनजीवनावर परिणाम होणार नसेल, तर जे विरोध करत आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं. राष्ट्रवादीची भूमिका विकासाबाबत नेहमीच पॉझिटिव्ह राहिली आहे. अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले, आपण पाहिले आहेत. पण यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल, तर शहानिशा करायला हवी,’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. एनरॉनलाही राजकीय विरोध झाला होता, पवार साहेब मुख्यमंत्री असताना विरोध झाला, पण नंतर युती सरकारने तो प्रकल्प केला. राजन साळवींचं वक्तव्य ऐकलं त्यांचा पाठिंबा आहे. त्या भागातल्या पर्यावरणाला कुठलाही फरक पडणार नसेल, तर गैरसमज दूर करून प्रकल्प करायला हरकत नाही, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचं पत्र समोर आहे, त्यांनी आपण लोकांसोबत आहोत, असं म्हणलं आहे. गरज पडली, माझं ठरलं तर मीही बारसूला जाईन, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना शाप देणार’, ‘बारसू’च्या राड्यावरून राऊत मुख्यमंत्र्यांवर संतापले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.