सोलापूर, 29 मे : प्रत्येक लोकप्रतिनिधी हा आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभा असतो. आपल्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत तो नेहमी त्यांच्यासोबत असतो. त्यामुळेच कार्यकर्ते हे आपल्या नेत्याला सर्वोच्च असा मान देतात. पण, सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (rajendra raut) हे मात्र त्याला अपवाद ठरले आहे. पाया पडण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या राऊत यांनी थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदारांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली प्रसाद दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बार्शीत एका क्रिकेटच्या सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आला होता. तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून लीनही झाला. मात्र तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली. या कानशिलात लगवल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.
(Post Office च्या या योजनेत पैसे होतील डबल, पाहा कोणत्याही स्किममध्ये किती फायदा)
मात्र, आमदार राऊत याच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. तसेच एखाद्याने पाया पडल्यानंतर कोणताही व्यक्ती पाया पडणाराची चूक माफ करतो मात्र बार्शीत नेमकं उलट घडलं, पाया पडला आणि कार्यकर्ता कानाखाली प्रसाद घडलं. आमदार राऊत यांच्या या प्रतापाबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.