मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bank Robbery CCTV: जालन्यात बँकेवर सशस्त्र दरोडा, घटनेचा VIDEO आला समोर

Bank Robbery CCTV: जालन्यात बँकेवर सशस्त्र दरोडा, घटनेचा VIDEO आला समोर

बँकेवर सशस्त्र दरोडा, घटनेचा VIDEO आला समोर

बँकेवर सशस्त्र दरोडा, घटनेचा VIDEO आला समोर

bank robbery caught in camera : बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जालना, 29 ऑक्टोबर : बँकेवर पुन्हा एकदा दरोडा (bank robbery) पडल्याची बातमी समोर आली आहे. शिरुर येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर गेल्या आठवड्यात दरोडा पडला होता त्यानंतर आता जालन्यात बँकवर दरोडा पडला आहे. अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा (Bank robbery on Buldhana urban bank) पडला आहे. ही घटना गुरुवार (28 ऑक्टोबर 2021) घडली आहे. हातात पिस्तुल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम आणि तारण असलेले अंदाजे 75 लाखांचे सोने घेऊन पसार झाले. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद (Bank robbery caught in CCTV) झाली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत शहागड येथील बाजार पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेची शाखा आहे. कामकाजाची वेळ संपल्यानंतर खातेदारांची वर्दळ कमी झाल्याचा फायदा या दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. कर्मचारी दैनंदिन कामकाज संपवत असतांना हातात पिस्तुल असलेल्या तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडले.

यानंतर दरोडेखोरांनी कॅश काउंटर व स्ट्रॉंग रूमकडे मोर्चा वळवला. स्ट्रॉन रूममधील लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि 25 लाख रुपये रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले. या दरोड्यात नेमका किती मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. अंदाजे 75 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा

गेल्या आठवड्यात शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा पडला होता. 21 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला होता. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

5-6 दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. सदर गाडीतून आरोपी नगर दिशेला पळून गेले आहेत. शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करा. तसेच या वर्णाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास अगर काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे. ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी व इसम पकडून ठेवावे असा संदेश पोलिसांनी सर्वत्र प्रसारित करत आरोपींचा शोध सुरू केला.

First published:

Tags: Buldhana news, Cctv, Cctv footage, Crime