मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

कार मुंबईहून सुरतकडे जात होती. जखमी महिलेवर कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

पालघर, 13 मे: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत एका कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा जागेवरच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बहुजन विकास आघाडीच्या मिरा भाईंदर विधी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिग्विजय त्रिवेदी हे कारने मुंबईहून सुरतकडे जात होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली.  दिग्विजय त्रिवेदी यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हेही वाचा.. भीषण अपघात: बसवर आदळली भरधाव कार, बड्या उद्योगपतीचा मुलगा जागेवरच ठार

दुसरीकडे, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे.  तरी काही लोक लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशातच मंगळवारी सायंकाळी मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात एक मोठी दुर्घटना घडली. लॉकडाऊनमध्ये काळात मित्रांसोबत कारमध्ये फिरायला आलेल्या एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. उभ्या असेलल्या बसवर भरधाव कार आदळून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा.. भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्यमान नागपाल (वय-18, रा. नेपियन्सी रोड) असं अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचं नाव आहे. आर्यमान हा मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगपती राजेश नागपाल यांचा मुलगा होता. आर्यमान हा त्याचा मित्र शौर्यसिंग जैन (वय- 19, रा. कफ परेड) आणि वेदांत पाटोदिया याच्यासोबत मरीन ड्राईव्ह चौपाटीवर भटकंती करण्यासाठी आला होता. शौर्यसिंग हा कार चालवत होता तर आर्यमान त्याच्या शेजारी तर वेदांत मागील सीटवर बसला होता. कार उड्डाणपुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर आली असता उभ्या असलेल्या बसवर आदळली. धडक एवढी भीषण होती की, आर्यमानचा जागेवरच मृत्यू झाला. तर शौर्यसिंग आणि वेदांत जखमी झाले आहे. शौर्यसिंग याला हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

First published: May 13, 2020, 12:56 PM IST

ताज्या बातम्या