मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मी मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार : बच्चू कडू

मी मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार : बच्चू कडू

आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू

आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, असं बच्चू कडू म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  Chetan Patil

अमरावती, 16 सप्टेंबर : शिंदे गटाचे समर्थक प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते. त्यांनी आज अमरावतीत बोलताना मंत्रिपदावरुन महत्वाची प्रतिक्रिया दिली. आमच्यासाठी मंत्रीपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रीपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्या बाहेरचा विषय आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. प्रहारचे आज दहा आमदार असते तर परिस्थिती थोडी बदलली असती. प्रहारचे दहा आमदार असते तर येणारा मुख्यमंत्री प्रहारचा असता, असं बच्चू कडू स्पष्ट म्हणाले.

('...तर मी वरळीतून राजीनामा देतो', आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाच्या आमदारांना सर्वात मोठं चॅलेंज)

"येत्या निवडणूकांमध्ये प्रहारचे 15 उमेदवार उभे करू. त्यापैकी 10 तरी निवडून आणू. आम्ही सत्तेजवळ जाणार नाही. पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल", असं बच्चू कडू म्हणाले.

"आम्ही राजकारणी लोक आहोत. राजकारण करावं लागतं. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची काय अवस्था हे आपल्याला माहिती आहे. राजू शेट्टी एकटेच राहाले. त्यामुळे कार्यकर्ते टिकून राहण्यासाठी काही खेळी करावी लागते", असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं.

First published:

Tags: Maharashtra government, Maharashtra News