मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'जगेल तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत ठेवणार नाही' असं म्हणत पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

'जगेल तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत ठेवणार नाही' असं म्हणत पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

  विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून आपल्या प्रेयसीला मिठी मारली होती.

विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून आपल्या प्रेयसीला मिठी मारली होती.

विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून आपल्या प्रेयसीला मिठी मारली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

औरंगाबाद, 22 नोव्हेंबर : लग्न करणार तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत राहू देणार नाही आणि मी राहणार नाही, असं म्हणत औरंगाबादमध्ये एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली होती. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून आपल्या प्रेयसीला मिठी मारली होती. त्यामध्ये गजानन मुंडे हा 95% जळाला होता. त्याचा रात्री उपचारादरम्यान बारा वाजता मृत्यू झाला आहे. तर तरुणाच्या आई वडिलावर तरुणी पूजा साळवे हिच्या नातेवाईकांकडून लग्नासाठी तगादा लावून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(श्रद्धा वालकर हत्याकांड : लहानपणापासूनच रागीट होता आफताब? बालपणीच्या मित्राने केले अनेक खुलासे)

पूजाने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. पण तरीही सुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला सारखं टाळते, पोलिसांकडे तिने तक्रार सुद्धा दिली होती. मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. पण तिने ते ओळखलं नाही. त्यामुळे आपणही जगायचं नाही, तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेऊन स्वत:ला पेटवून घेतलं, असा जबाब गजानन मुंडे याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला.

काय घडलं नेमकं?

पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या एकाच विषयात पीएचडी करत होते. गजानन मुंडे आणि पूजा साळवे हे दोघे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या कॉलेजमध्ये आले होते. त्यावेळी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. त्यानंतर प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमध्ये दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहे. गजानन मुंडे याचा मृत्यू झाला आहे. तर पूजावर उपचार सुरू आहे.

(प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती पत्नी, सहा महिन्यांनी सत्य समोर)

पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या विषयात एकत्र पीएचडी करत होते. त्यांना लवकरच फेलोशिप सुद्धा मिळणार होती. दोघेही आधी चांगले मित्र होते. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. गजानन हा हुशार विद्यार्थी होता. या प्रकरणामध्ये त्याच्या प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. पण, आपण सगळं विसरलो असल्याचे सांगायचा. पण, तो कायम टेन्शनमध्ये असायचा, असं त्याच्या मित्रांनी सांगितलं.

तर, गजानन हा नेहमीच त्रास देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली होती. माझा तो पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याची समजूत काढली. पण त्याने माझे काही ऐकले नाही, असा जबाब जखमी पूजाने दिला आहे. पूजाही शेतकरी कुटुंबातून आली. प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती औरंगाबादला आली. पूजाला एकूण 6 बहिणी आहे. ती प्राध्यापक व्हावी म्हणून मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे विनंतीही केली होती, असं सांगत पूजाच्या आईने अश्रूना वाट मोकळी करून दिली.

First published: