जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वर्धा : महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस म्हणाले...

वर्धा : महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस म्हणाले...

वर्धा : महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस म्हणाले...

भीमराव रमेश सिंगरे हे शनिवारी सरपण गोळा करण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट परिसरात गेले होते.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

वर्धा, 11 डिसेंबर : नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजीपंत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सत्याग्रही घाटात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला नेमकी कोण, तसेच तिचा मृतदेह सत्याग्रही घाटात कसा आला, याचा शोध तळेगाव पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - तळेगाव येथील रहिवासी भीमराव रमेश सिंगरे हे शनिवारी सरपण गोळा करण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट परिसरात गेले होते. ते सत्याग्रही घाटात महामार्गालगत असलेल्या भागातून सरपण गोळा करीत असताना राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 300 फुट अंतरावर त्यांना महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भीमराव यांनी तातडीने गावातील नागरिकांना माहिती देत तळेगाव पोलिसांना माहिती दिली. तळेगाव पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत परिसराची बारकाईने पाहणी केली. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. हेही वाचा -  वर्धा : गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर मृतक ही ३० ते ४० वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तातडीने तळेगाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याने घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. लवकरच या प्रकरणातील कोडे सोडवू, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात