औरंगाबाद, 24 डिसेंबर, अविनाश कानडजे : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा गर्भपात करण्यासाठी पतीने तिला आवश्यकतेपेक्षा अधिक गोळ्यांचा डोस दिला. गर्भपाताच्या अधिक गोळ्या घेतल्यानं रक्तस्त्राव होऊन या महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथील ही घटना आहे. वैशाली बाळासाहेब क्षीरसागर असं मृत महिलेचं नाव आहे तर बाळासाहेब गणपत क्षीरसागर असं पतीचं नाव आहे. या प्रकरणात बाळासाहेब क्षीरसागर याच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्तस्त्राव होऊन मृत्यू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब क्षीरसागर याची पत्नी वैशाली क्षीरसागर या गर्भवती होत्या. मात्र आपत्य नको असल्यानं पती बाळासाहेब क्षीरसागर याने पत्नीचा गर्भपात करण्यासाठी त्यांना गर्भपाताच्या गोळ्यांचा डोस दिला. हा डोस गरजेपेक्षा जास्त झाल्यानं रक्तस्त्राव होऊन वैशाली क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा : रात्रीस खेळ चाले! पुण्यात चितेसोबत तृतीयपंथीयांचे आघोरी कृत्य; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं पतीविरोधात गुन्हा दाखल दरम्यान या प्रकरणात पती बाळासाहेब क्षीरसागर यांच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.