औरंगाबाद, 27 जानेवारी : कोरोना काळानंतर जगभरामध्ये वैद्यकीय क्षेत्राला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. भारताने देखील वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशात वैद्यकीय सेवा आणि आधुनिक हॉस्पिटलचं जाळं विस्तारत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडतील या दरात चांगले उपचार मिळणं देखील आवश्यक आहे. आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या वैद्यकीय क्षेत्राला केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत ते पाहूया
काय आहे मराठवाड्याची मागणी?
आशिया खंडात सर्वात वेगाने विकसित होणारं औद्योगिक शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या शहरात मराठवाड्यासह खान्देश आणि विदर्भातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्याचबरोबर इथं बाहेरगावाहून शिकायला राहण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटनाची राजधानी अशीही औरंगाबादची ओळख आहे. त्यामुळे इथं पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते.
औरंगाबाद शहरांमध्ये मेडिकल टुरिझम ही संकल्पना रुजत आहे. मराठवाडा, विदर्भासह विदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता औरंगाबादमध्ये एम्ससारखं दर्जेदार हॉस्पिटल असावं अशी मागणी करण्यात येत आहे. अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये याबाबतची घोषणा केली तर लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शहरातील तसंच ग्रामीण भागातील हेल्थ केअर सेंटर अद्यायावत होणे आवश्यक असून त्यासाठी बजेटमध्ये तरतूद आवश्यक आहे.
औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांना बजेटपासून काय हवं? पाहा Video
वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाला प्रचंड महत्त्व आहे. या संशोधनाचा रुग्णांना फायदा होत असतो. त्यामुळे सरकारनं संशोधन विभागाकडंही आगामी बजेटमध्ये लक्ष द्यावं. त्याचबरोबर हेल्थ केअरसाठी लावण्यात आलेल्या जीएसटीमध्ये कपात करावी अशी मागणी औरंगाबादच्या मेडिकल क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
लाखो रुपये खर्च करून औरंगाबाद शहरामध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तयार करण्यात आलंय. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती मात्र या ठिकाणी दर्जेदार डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे याचा कसलाच फायदा होत नाही यामुळे याकडे देखील सरकारने लक्ष द्यावे.
'कोरोना काळात आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती आगामी काळात होऊ नये यासाठी भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र अद्यावत असणे खूप गरजेचे आहे ज्यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येतील,' असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी व्यक्त केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Budget 2023, Health, Local18, Money