मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबाद : प्रेयसीसाठी काहीही..., त्या तिघांचा प्रताप ऐकून पोलीसही चक्रावले

औरंगाबाद : प्रेयसीसाठी काहीही..., त्या तिघांचा प्रताप ऐकून पोलीसही चक्रावले

प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं असं म्हणतात. मात्र औरंगाबादमधील तीन तरुणांनी हद्दच केली आहे. पोलिसांनी या तरुणांना अखेर बड्या ठोकल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Ajay Deshpande

औरंगाबाद, 1 डिसेंबर : प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं असं म्हणतात. मात्र औरंगाबादमधील तीन तरुणांनी हद्दच केली आहे. आपल्या प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी ते चक्क दुकाची चोर बनले आहेत.  त्यांनी आतापर्यंत अनेक दुचाकींची चोरी केली आहे. चोरलेल्या दुचाकी विकून आलेल्या पैशांमधून ते आपल्या प्रेयसीचा हट्ट पुरवत होते. मात्र या दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी या तीनही तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत अंदाजे  नऊ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रेयसीसाठी दुचाकींची चोरी  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  आपल्या प्रेयसीचा हट्ट पुरवण्यासाठी तीन तरुणांनी संगनमताने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. त्यांनी चोरीच्या अनेक दुचाकी विकल्या देखील. चोरीच्या दुचाकी विकून आलेला पैसा ते आपल्या प्रेयसीवर खर्च करायचे. दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यानं औरंगाबाद गुन्हे शाखेचं पथक चोरांच्या मागवर होतं. अखेर या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.  नारायण रामराव भंडारे, कृष्णा ज्ञानोबा होळकर,अर्जुन मधुकर वाकळे तिघांचेही वय 25 वर्ष अशी या आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा :   Video : सांगलीकरांची बातच निराळी; मिरजेतील खराब रस्त्यांचा मुद्दा थेट कतारमध्ये पेटवला

11 दुचाकी जप्त

पोलिसांनी या प्रकरणात तिघाना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत अंदाजे नऊ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी ते दुचाकी चोरत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Crime, Crime news, Police