मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेगावला दर्शनासाठी निघाले मात्र रस्त्यातच 6 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावर घडलं भयानक

शेगावला दर्शनासाठी निघाले मात्र रस्त्यातच 6 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावर घडलं भयानक

अपघातग्रस्त कार

अपघातग्रस्त कार

शेगावला देवदर्शनाला जाणाऱ्या कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 13 मार्च : देवदर्शनाला जाताना अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील दोन कुटुंब शेगाव इथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चालले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात तब्बल 6 जण ठार झाले आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी पिसा गावात दरम्यान मारुती अर्टिगा वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. काल सकाळी हा भीषण अपघात झाला. चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून बोरुडे आणि बर्वे परिवार शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता जात होते, मात्र समृद्धी महामार्गावर शिवणी पीसा गावाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे वरचे छप्पर उडून यामधील प्रवासी अक्षरशः रस्त्यावर विखुरले गेले होते. या अपघाताची नंतरची ही दृश्य मनाला चटका लावून जाणारी आहेत.

पुण्यात कारचा भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी

या अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर एकापाठोपाठ भीषण अपघात झाले आहे. त्यामुळे महामार्गावरअपघातांची जणू काही मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे.

First published:

Tags: Accident, Buldhana news, Death, Major accident, Road accident