औरंगाबाद, 08 सप्टेंबर : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ( aurangabad ) शहरातील पडेगाव येथील सैलानी बाबा दर्ग्यामध्ये ( sailani baba dargah) गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या 28 वर्षांपासून या ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येते. यामुळे सर्वधर्मसमभावाची भावना या ठिकाणी बघायला मिळते. आज घडीला सर्व धर्मांचे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात आनंदाचे वातावरणात या ठिकाणी बघायला मिळते. औरंगाबाद शहरातील पडेगाव येते सैलानी बाबा दर्गा आहे. येथील सदगुरू शंकर बाबा पोथीकर हे सैलानी बाबाचे भक्त होते. त्यांना सैलानी बाबा प्रसन्न असल्याचं येथील भाविक सांगतात. 45 वर्षापूर्वी सैलानी बाबाचा दर्गा औरंगाबाद शहराच्या मध्यभागी होता. मात्र, नंतर ते औरंगाबाद शहरातील पडेगाव भागामध्ये सदगुरू शंकर बाबा पोथीकर राहायला आल्याने या ठिकाणी सैलानी बाबाची दर्गा बनवण्यात आली. हेही वाचा :
Aurangabad : सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी, तुम्ही घरबसल्या घ्या अनुभव VIDEO अशी झाली स्थापनेला सुरुवात शंकर बाबा यांना सैलानी बाबा प्रसन्न असल्यामुळे येथील भाविक त्यांच्याकडे येत असतं. त्यांच्याकडे येणारे भाविक हे सर्वधर्माचे येत असतं. यामुळे त्यांनी सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये गणेशमूर्ती बसवायला सुरुवात केली. शंकर बाबा यांचे निधन झाल्यानंतर त्यांची देखील समाधी या दर्ग्यामध्ये बनवण्यात आली. त्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील समाधी याच दर्ग्यामध्ये आहे. गेल्या 28 वर्षांपासून या दर्ग्यामध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जात असल्यामुळे या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक येत असतात. या ठिकाणी होतात सर्व धर्माच्या पूजा गुरुवारी या ठिकाणी सर्व धर्माच्या पूजा,आरती आणि नमाज पठण केली जाते. गुरुवारी शंकर बाबा यांना देखील स्नान घातलं जातं आणि त्यानंतर अकरा वाजता सर्व धर्माच्या आरती केल्या जातात. ज्या भाविकांना दर्शनासाठी यायचं असेल ते गुरुवारी आवर्जून यावं तसेच रोज दर्शनासाठी सकाळी सात ते सायंकाळपर्यंत दर्गा सुरू असतो असं शंकर बाबा यांच्या सूनबाई पल्लवी पोथीकर सांगतात. हेही वाचा :
VIDEO : बीडमध्ये साकारला जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवीचा आकर्षक देखावा गेल्या 28 वर्षांपासून मी या दर्ग्याची सेवा करते. येथे जी इच्छा मागितली ती पूर्ण होते. या ठिकाणी असलेल्या सर्वधर्मसमभावाची भावना हे या दर्ग्याचे वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच आम्ही या ठिकाणी येत असतो, असं भाविक संगीता कुलकर्णी या सांगतात.
तुम्हाला जर या सैलानी बाबाच्या दर्ग्याचे दर्शन घ्यायचं असेल तर औरंगाबाद शहरामध्ये पडेगाव येथे सैलानी बाबा दर्गा आहे . या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही या 99601 26405 क्रमांकावर संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







