जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी, तुम्ही घरबसल्या घ्या अनुभव VIDEO

Aurangabad : सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी, तुम्ही घरबसल्या घ्या अनुभव VIDEO

सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी औरंगाबादकरांची मोठी गर्दी होत आहे.

सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी औरंगाबादकरांची मोठी गर्दी होत आहे.

Aurangabad: सुवर्ण मंदिर (Golden Temple) पाहण्यासाठी औरंगाबादकरांची मोठी गर्दी होत आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 07 सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त औरंगाबाद (Aurangabad) शहरामध्ये विविध गणेश मंडळातर्फे विविध देखावे यंदाही साकारण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये सर्वात आकर्षित करणारा देखावा चिकलठाणा येथील श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे. भव्य अशा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची (Golden Temple) प्रतिकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली असून हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहिला मिळत आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर यंदाचा गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येत आहे. यामुळे गणेश मंडळाच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात विविध देखावे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येच चिकलठाणा येथील श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने श्री सावता मंगल कार्यालयाजवळ अमृतसर येथील सुवर्ण मंदिर प्रतिकृती देखाव्या स्वरूपात साकारण्यात आली आहे. श्री संत सावता गणेश मंडळाची स्थापना 1984 मध्ये झाली तेव्हापासून गणेश मंडळाच्या वतीने विविध देखावे व उपक्रम राबवले जातात. हेही वाचा : Nashik : गणपती बाप्पा सांगतो मतदान करा… मोठ्या त्रुटीवरही ठेवलं बोट VIDEO या अगोदर श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने अंबरनाथ यात्रा, समुद्रमंथन, कारगिल युद्ध, तिरुपती बालाजी मंदिर, सीता हरण, शिवस्वराज्याभिषेक, सावता महाराजांचा मळा, द्रोपदी वस्त्रहरण, साई महिमा इत्यादी देखावे या मंडळाने साकारलेले आहेत. दरवर्षी आकर्षित देखावे या मंडळाकडून साकारले जातात. यामुळे प्रत्येक वर्षी गणेश भक्तांना श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने कोणता देखावा सादर करणार अशी उत्सुकता असते. भारतामध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला सुवर्ण मंदिर कसे आहे हे पाहण्याची उत्सुकता असते. त्यामुळे त्याची प्रतिकृती साकारण्याची संकल्पना गणेश मंडळाच्या सदस्यांना आली आणि त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतीक्षेत या  सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. अडीच लाख रुपये खर्च गोळा करण्यासाठी प्रत्येक सदस्याने मदत केली. हेही वाचा :  VIDEO : ‘कोरडे गणपती’ नाव कसे पडले माहिती आहे का? रंजक आहे इतिहास यासाठी नांदेड येथील गुरुद्वारा प्रमुख बाबा रामसिंग यांना याची माहिती देऊन परवानगी मागण्यात आली. त्यावेळी त्यांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी दिली. या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा यासाठी शहरातील प्रत्येक गुरुद्वारातून रोज प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारापासूनच स्वयंसेवक उभे आहेत ते प्रत्येकाला मार्गदर्शन करतात तसेच नियमांचे व शिस्तीचे पालन या ठिकाणी होत आहे. आम्हीही सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारताना शीख धर्मांच्या प्रत्येक नियमांचे पालन केले आहे. येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होते व त्यांच्या प्रथा व नियमानुसार या ठिकाणी  पालन केले जाते, असं आयोजक संजय डोळस सांगतात. श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती आम्ही आज बघितली. हा देखावा बघून आम्हाला अमृतसरला आल्याचा भास होत आहे, असं भाविक भूपेंद्र सिंग दौडा यांनी सांगितले. चिकलठाणा येथील श्री संत सावता मंगल कार्यालय येथे हा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्येक भाविकाला बघता येणार आहे. अधिक माहितीसाठी 91 84214 72296 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात