अविनाश कानडजे, प्रतिनिधी कन्नड, 17 जानेवारी : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह घराजवळील विहिरीत आढळले आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणी मागील 3 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. आज सकाळी दोघींचे मृतदेह हे घराजवळील विहिरीतील पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दत्तू बाबुराव चव्हाण हे शेतात राहतात. त्यांच्या दोन मुली स्वाती दत्तू चव्हाण (19) आणि शितल दत्तू चव्हाण (15) या बेपत्ता असल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. (शाळेत पोहोचण्याआधीच मृत्यूनं गाठलं; कारमधून कामासाठी निघालेल्या महिला प्रिंसिपलचा दुर्दैवी अंत) मागील तीन दिवसांपासून दोन्ही बहिणींचा शोध घेतला जात होता. पण कुठेच पत्ता लागला नाही. पण आज दत्तू चव्हाण यांच्याच शेतातील विहिरीत स्वातीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यानंतर विहिरीत अजून शोधण्याचा प्रयत्न केला असता शितलचाही मृतदेह त्याच विहिरीत मिळून आलाय. घराजवळीलच विहिरीत मुलींचे मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली, तर दोन्ही मुली एकदाच दगावल्याने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. शंकर पट पाहून घरी परततांना तळेगाव परिसरात दोन अपघातात चार ठार दरम्यान, अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून शंकर पट सुरू आहे. पट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येतात. मात्र सोमवारी शंकरपट पाहून घराकडे परताताना रात्री उशिरा तळेगाव परिसरात दोन अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. ( रक्ताची उलटी झाली आणि गेला जीव; Nepal plane crash नंतर भारतातही विमान प्रवासात भयं ) शंकरपट पाहून घराकडे परतणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. दुसऱ्या घटनेत यवतमाळहून धामणगावकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांना कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे व कारचालक असे तिघे जागीच ठार झाले. या घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.