संभाजीनगर, 07 मार्च : आधीच पिकांना भाव नाही, त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हताशा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने उभं पिक आडवं झाल्याचं पाहून तोंड झोडून घेतलं.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतंय. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातही नुकसान झाले आहे.
पिकं आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून, छत्रपती संभाजीनगरमधला व्हिडीओ pic.twitter.com/ztgB36Gjrh
— News18Lokmat (@News18lokmat) March 7, 2023
सोसाट्याचा वारा आणि पावसाने शेतात उभे पिक भुईसपाट झाले आहे. गंगापूर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. गहू, हरबरा, पिके आडवी झाली. आंबा सध्या काही ठिकाणी फुलोऱ्याला आहे जोरदार वाऱ्याने फुलोरा झडला आहे. आंब्याचे बारीक मनी सुद्धा गळाले आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
(वादळाने मोडला संसार, मध्यरात्री लेकरांना घेऊन लोकं पोहोचली तहसीलदाराच्या कार्यालयात)
आडवी झालेली पिकं पाहून शेतकरी हताश झाले आहे. एका शेतकऱ्याने सकाळी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली असता डोळ्यात पाणी आलं. एवढ्या मेहनतीने पिकवले पिक पाण्यात वाहून गेली आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. पिकांची अवस्था पाहून स्वत:लाच शेतकऱ्याने शिक्षा दिली. आपल्या हाताने तोंडू झोडून काढत शेतकऱ्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, सभागृहात आवाज उठवू- अजित पवार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सहा ते नऊ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल. त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू असं राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Farmer, Local18, Rain fall