धाराशिव, 7 मार्च : राज्यात अनेक ठिकाणी वादळी आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील एका काही कुटुंबाना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.
धाराशिवच्या खासापुरी येथील स्थलांतरित कुटुंब रात्री 2 वाजता मुला बाळांसह तहसील कार्यालयात दाखल झाले. रात्री उशिरा आलेल्या वादळामध्ये अनेकांच्या पत्र्याची घर जमीनदोस्त झाली. यामुळे जिवाचा बचाव करत अडकलेल्या लहान मुलांना आणि वयोवृद्धांना बाहेर काढुन अखेर या कुटुंबानी तहसील कार्यालय गाठले. तसेच जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नसल्याचा निर्धार या कुटुंबानी केला.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे गाव न्यायालयाच्या आदेशानुसार खाली करण्यात आले. त्यामुळे येथील ग्रामस्थ गेली दीड महीन्यांपासुन तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव करत आहेत. मात्र, सातत्याने या ग्रामस्थांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. वादळी वाऱ्यामुळे सतत पत्रे उडुन जातात. त्यामुळे आपल्या लहान मुलांना घेऊन ही कुटुंब जिवावर उदार होत याठिकाणी वास्तव करत आहेत.
होळी अवकाळीची! राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान, शेतकऱ्यांना मोठा फटका
त्यात अचानक आलेल्या वादळामध्ये यापुर्वीही अनेकांना जिव वाचवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ घराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी या कुटुंबाने वारंवार केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल जात आहे. दरम्यान रात्री उशिरा आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांची घर जमीनदोस्त झाली. दरम्यान, यामध्ये अडकलेल्या लहान मुलांना आणि वयोवृद्धाना बाहेर काढुन रातोरात या कुटुंबानी थेट तहसील कार्यालयात गाठले आहे.
एकीकडे सर्वत्र होळीचा सण उत्साहात साजरा करत असताना या कुटुंबाना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या घराचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत तहसील कार्यालयातुन उठणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, दोन दिवसात जर आमची सोय नाही केली तर आत्मदहन करण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Osmanabad, Rain fall, Weather Update