औरंगाबाद : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्यानिमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. मुद्दाम काही प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. धर्मावर प्रश्न उपस्थित करुन मुळ मुद्द्यांपासून पळ काढला जात असल्याची टीका यावेळी अंधारे यांनी केली आहे. नेमकं काय म्हणाल्या अंधारे? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. मुद्दाम काही प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. धर्मावर प्रश्न उपस्थित करून मुळ मुद्द्यांपासून पळ काढला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री नावाला आहेत, पोझिशन आहे पण पावर नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री टोलवाटोलवीची उत्तर देतात. उथळ आणि शॉर्ट टेम्प्लेट गोष्टी करून राज्य चालत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा गेम केला आहे. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. पत्रकार म्हणतील मी शिंदे गटाकडे जाईल, पण आम्ही सज्जन लोक आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. हेही वाचा : तर आधी मविआमधून बाहेर पडा आणि नंतर.. ; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान ‘प्रत्येक मुद्दा धर्मावर’ पुढे बोलतान सुषमा अंधारे म्हणाल्या की, इथे प्रत्येक मुद्दा धर्मावर नेऊन ठेवला जात आहे. नोटावर कोणाचे फोटो आहेत? त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही , पण याच नोटांच्या अंतराष्ट्रीय बाजारामधील किंमतीबाबत बोलणार का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : ‘..असं ढोंगी सावरकर भक्तांना का वाटत नाही?’ राऊतांचा भाजपवर प्रहार, राहुल गांधींनाही सुनावले सत्तारांना टोला दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंधारे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना देखील टोला लगावला आहे. अब्दुल सत्तार कोणत्या हिंदुत्वासाठी तिकडे गेले असा सवाल उपस्थित करत त्यांना फक्त खुर्च्या गरम करायच्या आहेत असा घणाघात अंधारे यांनी केला. आज महाप्रबोधन यात्रेच्या या टप्प्याचा शेवट औरंगाबादमध्ये झाला. आता उद्यापासून पुढच्या टप्प्याला कणकवलीमधून सुरुवात होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.