जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक; आरक्षणाची पुढील दिशा ठरणार!

जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक; आरक्षणाची पुढील दिशा ठरणार!

जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक; आरक्षणाची पुढील दिशा ठरणार!

जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मराठा मोर्चाचे राज्यभरातील सर्व प्रमुख समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

  • -MIN READ Jalna,Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 8 जानेवारी :  जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मराठा मोर्चाचे राज्यभरातील सर्व प्रमुख समन्वयक उपस्थित राहणार आहेत. महापुरुषांबद्दल राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अवमानजनक, वादग्रस्त वक्तव्याची मालिका अजूनही सुरूच आहे. याचा या बैठकीत निषेध नोंदवला जाणार आहे. तसेच आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाची पुढील दिशा देखील ठरवली जाणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. राज्यातील सर्व समन्वयक उपस्थित राहाणार  जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला मराठा मोर्चाचे राज्यभरातील सर्व प्रमुख समन्वयक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला आज सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. हेही वाचा :  आमदार योगेश कदम यांचा अपघात नसून घातपाताचा कट? माजी मंत्री कदम यांचा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी  या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. तसेच मराठा समाजातील इतर समस्यांवर देखील बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच सध्या विविध राजकीय पक्षांच्या  नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमानकारक आणि वादग्रस्त व्यक्तव्य केली जात आहेत, याचा देखील या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात