औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : दिवसेंदिवस राजकीय पक्ष आणि संघटनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि संघटनांसह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. वाढणाऱ्या संख्येसोबत या राजकीय पक्ष आणि संघटेनच्या पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबाद शहरात चौकाचौकांमध्ये भाऊ, दादा या आशयाची अनधिकृत होर्डिंगची संख्या देखील वाढली आहे. यासोबतच इतरही होर्डिंगचे प्रमाण शहरात वाढले आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण करण्यात या भाऊ, दादा सोबत इतरही होर्डिंगचा मोठा वाटा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद महानगरपालिकेने आता अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवरती विशेष मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहर राज्याची पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी पर्यटक व नागरिक रोज ये-जा करत असतात. औरंगाबाद शहराचे इतिहासामध्ये व जगाच्या नकाशामध्ये ठळक वैशिष्ट्य आहे. मात्र, असं असलं तरी राजकीय पक्ष आणि संघटनांच्या भाऊ, दादा आणि इतरही होर्डिंग चौकाचौकांमध्ये गर्दी करीत आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनातील स्वयंघोषित हे भाऊ, दादा स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी शहरातील विविध चौकाचौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग लावतात. या होर्डिंग मुळे शहराचे विद्रोपीकरण होत आहे. अनेक वेळा पर्यटनासाठी येणारे नागरिक या अनधिकृत होर्डिंगकडे बघून अनेकदा शहराला नावे ठेवतात. त्यामुळे शहरामध्ये अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
Video : आजच काढा वाहन विमा, अन्यथा भोगावे लागणार गंभीर परिणाम!
त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासक पदी नव्याने रुजू झालेले डॉ. अभिजीत चौधरी ॲक्शन मोडवर आले आहेत. परवानगी न घेता चौकाचौकांमध्ये अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्या भाऊ, दादांवर 18 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनधिकृतपणे होर्डिंग वरती दंडात्मक दोन हजार रुपयांची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी शहरातील नागरिकांनी आपले शहर सुंदर व स्वच्छ होण्यासाठी मोहीम राबवताना सहकार्य करावे, असं आवाहन देखील अभिजीत चौधरी यांनी केलं आहे. अधिकृत होर्डिंग लावण्यासाठी येथे करा अर्ज तुम्हाला जर का शहरांमध्ये होर्डिंग लावायचे असतील तर तुम्हाला तुमच्या वार्ड कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे. वॉर्ड अधिकारी ते होर्डिंगचा मजकूर आणि डिझाईन पाहतील तो अपरिहार्य नसेल तरच त्याला शहरांमध्ये किंवा एखाद्या चौकामध्ये होल्डिंग लावण्याची परवानगी मिळणार आहे. फक्त लहान होर्डिंगसाठी परवानगी आहे. यासाठी दोनशे ते पाचशे रुपये असा दर लावण्यात येणार आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘गोड’ बातमी, औरंगाबादच्या डॉक्टरांचं औषध ठरणार वरदान!
18 नोव्हेंबर नंतर यासाठी विशेष पथक महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे होर्डिंग लावल्याचे आढळून आल्यास त्यांची जबाबदारी प्रभाग कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक व बांधकाम निरीक्षकांवरती देण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर नंतर यासाठी विशेष पथक नेमले जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी स्वतः विशेष लक्ष घालणार आहेत.

)







