जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'गोड' बातमी, औरंगाबादच्या डॉक्टरांचं औषध ठरणार वरदान!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'गोड' बातमी, औरंगाबादच्या डॉक्टरांचं औषध ठरणार वरदान!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'गोड' बातमी, औरंगाबादच्या डॉक्टरांचं औषध ठरणार वरदान!

यावर्षीच्या मधुमेह दिनाच्या दिवशी एक गुड न्यूज आहे. औरंगाबादच्या डॉक्टरांनी या आजारावर खास डिव्हाईस शोधले आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 14 नोव्हेंबर : मधुमेह हा सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये वेगाने वाढणारा आजार आहे. अनेक तरूण तसंच लहान मुलांनाही मधुमेहाची लागण होते. या आजाराबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावे तसंच मधुमेहांच्या परिणांबाबत जागृती व्हावी यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या मधुमेह दिनाच्या दिवशी एक गुड न्यूज आहे. औरंगाबाद च्या डॉक्टरांनी या आजारावर खास डिव्हाईस शोधले आहे. या डिव्हाईसमुळे या रुग्णांना वारंवार सुई टोचायला लागणार नाही. काय आहे संशोधन? औरंगाबादच्या डॉ. संगिता डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मधुमेहावर ‘इन्सुलिन इंजेक्शन डिव्हाईस’ बनवलं आहे. त्यामुळे रुग्णांना वारंवार सुई टोचल्यामुळे होणारा त्रास कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. भारत हा मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत जगात दुसरा देश आहे सरासरी सात कोटी सत्तर लाख मधुमेही भारतात असून यामध्ये 1.2 कोटी रुग्ण हे 65 वयोगटातील आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मधुमेह या आजाराच्या रुग्णांच्या आकडेवारी आणि  कारणांचा शोध घेतल्यास अनेक रुग्णांच्या मृत्यूस मधुमेह हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणीभूत ठरताना दिसून येतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    देशामध्ये वाढत असलेल्या या मधुमेहासारख्या आजारावरती आपण काहीतरी पर्याय काढावा ही संकल्पना शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात नोकरीवर असलेल्या डॉ.संगीता डोंगरे यांना सुचली. त्यांनी या विषयावर डॉ. प्रकाश वानखेडकर (नाशिक), डॉ. शेख हासीम मोहमंद इसाक (धुळे), डॉ. युसुफ इब्राहिम पटेल (जळगाव), डॉ. प्रशांत बागूल (धुळे) यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून ही संपूर्ण टीम या संशोधनासाठी रात्रंदिवस एक करून काम करत आहेत. या संपूर्ण टीमच्या मदतीने ‘इन्सुलिन इंजेक्टिग डिव्हाईसचा’ चा शोध लावला आहे. या डिव्हईसला नुकतेच ऑस्ट्रेलियातील पेटंट देखील मिळालंय. मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video डॉक्टर डोंगरे यांच्या  टीमने तयार केलेलेले डिव्हाईस रुग्णांच्या दंडावर किंवा मांडीवर लावता येऊ शकते. या डिव्हाईसच्या मदतीनं रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण तपासणी करता येते. तसंच इन्सुलिन किंवा ग्लुकोज डोस देता येतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांना वारंवार सुई टोचण्याची आवश्यकता नाही अथवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणे किंवा कमी होणे याचा त्रास देखील होणार नाही. काय आहे किंमत? या डिव्हाईस निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलीय. लवकरच हे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. सर्वसामान्यांना याची खरेदी करता यावी यासाठी याची किंमत 1 हजारापर्यंत असावी असा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. डोंगरे यांनी स्पष्ट केले. रोजच्या लाईफमधील या चुकांमुळे डायबिटीस होण्याचा धोका, आधीच घ्या काळजी मधुमेह हा आजार देशभरामध्ये वाढत असल्यामुळे यावरती काम करावं असं माझ्या डोक्यात आला आणि त्यामुळेच आम्ही कामाला सुरुवात केली या कामात आम्हाला यश मिळाला आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचं पेटंट मिळालं. आमच्या या प्रयत्नामुळे मधुमेह रुग्णांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना डॉ. डोंगरे यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात