बीड, 15 नोव्हेंबर : दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी वाहन विमा आवश्यक मानला जातो. वाहन चालवण्यासाठी मोटार विमा महत्त्वाचा आहे. जर तुमच्या वाहनाचा विमा संपला असेल तर विहित वेळेत विमा हप्ता जमा करून नूतनीकरण करावे लागेल. जर विमा नूतनीकरण झाला नाही तर अपघात झाल्यास सर्व खर्च तुम्हालाच भरावा लागतो. तसेच विमा नसलेले वाहन चालवल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. अनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत. यात वाहनाचा विमा देखील अगदी महत्त्वाचा आहे. वाहनाचा अपघात झाल्यास, वाहन विमा संरक्षण नसल्यास संपूर्ण खर्च वाहनधारकास करावा लागतो. विम्याची मुदत संपल्यानंतर अनेक वाहनधारक नव्याने विमा काढत नाहीत. अशावेळी अपघात झाल्यास वाहन धारकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच वाहनाचा विमा नसेल तर कायद्याने कारवाई देखील होऊ शकते. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर सरकारी नियमानुसार विमा मिळतो. मात्र, वाहनाच्या विम्याची मुदत संपल्यानंतर अनेकजण विमा काढत नाहीत. मात्र विमा संपताच तो काढणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनानुसार विम्याचे वेगवेगळे नियम आहेत. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा मोठ्या अवजड वाहनांसाठी विम्याचे नियम बदलतात. वाहनामुळे दुसऱ्या गाडीला अपघात झाल्यास नियमानुसार हे असतात अधिकार; जाणून घ्या अशावेळी काय कराल थर्ड पार्टी विम्यामध्ये थर्ड-पार्टी दायित्वांचा समावेश होतो. एखाद्याच्या वाहनाचे किंवा मालमत्तेचं अनवधानानं झालेलं नुकसान थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. विमा नसलेले वाहन रस्त्यावर चालविल्यास दोन हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. अपघात झाल्यानंतर विमा नसल्यामुळे वाहनांची नुकसान भरपाई देखील मिळत नाही. मोटर वाहन विम्याचे फायदे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 146 आणि 147 अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्यामुळे अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण प्राप्त होते. अपघात, दंगल, चोरी, नैसर्गिक आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. यात तृतीय पक्षाच्या कायदेशीर दायित्वाच्या अंतर्गत मालमत्तेला झालेल्या कोणत्याही हानीसह, अपघाती मृत्यू आणि एखाद्या व्यक्तीला झालेली इजा देखील समाविष्ट केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







