Home /News /maharashtra /

Nashik : घरामध्येच सुरू केला मसाला उद्योग; आज महिन्याला होतेय दीड लाखांची कमाई

Nashik : घरामध्येच सुरू केला मसाला उद्योग; आज महिन्याला होतेय दीड लाखांची कमाई

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव ( Khedgaon ) येथील चार महिलांनी आपला स्वतःचा घरगुती मसाला उद्योग ( spice industry ) सुरू करून चांगलीच उंच भरारी मारली आहे.

  नाशिक 30 जुलै ;  प्राचीन काळापासून मसाल्यांचा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी करण्यात आला आहे. मसाल्यांचा वापर जेवणामध्ये केल्याने जेवणाला एक विशिष्ट चव येते. त्यामुळे विविध प्रकारच्या मसाल्यांना बाजारपेठेत ( market ) नेहमीच मागणी असते. मसाल्यांची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव ( Khedgaon ) येथील चार महिलांनी आपला स्वतःचा घरगुती मसाला उद्योग ( spice industry )  सुरू करून चांगलीच उंच भरारी मारली आहे. चला तर मग या स्पेशल रिपोर्ट मधून त्यांच्या घरगुती मसाला उद्योगा बद्दल जाणून घेऊया... नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे चित्रा डोखळे, शारदा डोखळे,अश्विनी महाले आणि शीतल डोखळे या चारही महिला राहतात. कोरोना काळात घरी असताना आपण काही तरी स्वतःच केलं पाहिजे असे यांच्या मनात सतत विचार येत होते. कारण फक्त शेतीवर अवलंबून राहणे सद्या अवघड झालं आहे. शेत मालाला कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही म्हणून त्यांनी घरच्या घरी मसाला उद्योग सुरू करण्याचे ठरवले. कारण मसाला बनवण्यासाठी बरेच साहित्य हे शेतकऱ्यांकडून मिळत असते. त्यामुळे जवळच्याच शेतकऱ्यांकडून साहित्य घेऊन त्यांनी घरगुती मसाला उद्योग सुरू केला आहे.

  हेही वाचा : Aurangabad : जवळच्या नातेसंबंधात लग्न केल्याने होतो 'हा' आजार, कसा टाळणार धोका? पाहा VIDEO

  9 प्रकारचे विशेष मसाले मसाला बनवण्याची माहिती ही त्यांनी बाहेरून घेतली. मात्र, आपण आपला स्वतःचा ब्रँड तयार करूयात असा विचार करून त्यांनी 'कृषी कन्या फूड प्रोडक्ट्स' हा ब्रँड तयार  करून त्याअंतर्गत तब्बल 9 प्रकारचे मसाले तयार केले आहेत. काळा मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, गावरान कणी मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मटण मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला अशी नावे दिली आणि बघता बघता त्यांच्या या मसाल्याला मागणी वाढली असून अगदी जपानला सुद्धा त्यांच्या मसाल्याची विक्री होत आहे. कशी मिळाली प्रेरणा? कोरोना काळात हाताला काम नव्हते शेतीतून फारस काही भागत नव्हते म्हणून विचार केला की आपण काही तरी केलं पाहिजे. उद्योग तरी सुरू केला पाहिजे पण उद्योग काय करावा ? हा देखील आमच्या समोर प्रश्न होता कारण उद्योग सुरू करायचा म्हणजे भांडवल लागत आणि भांडवल आमच्याकडे नव्हते. आपल्याच शेतात पिकणाऱ्या वस्तुंचा आधार घेत मसाला उद्योग सुरू केला तर असा मनात विचार आल्यानंतर चित्रा डोखळे यांनी आपल्या जवळच्या मैत्रिणींकडे संकल्पना मांडली. त्यानी देखील होकार दिला आणि मसाला व्यवसाय सुरू केला. आज चांगला नफा मिळत असल्याने घराला देखील हातभार लागत आहे. मार्केटिंगसाठी आम्ही जरा कमी पडतोय मात्र हळूहळू प्रयत्न करतोय, अशी प्रतिकिया चित्रा डोखळे यांनी दिली Local18 शी बोलताना दिली. आम्ही बनवलेले मसाले हे सर्व घरगुती आणि उत्तम प्रतीचे असल्याने या मसाल्याला बाजारपेठेत मागणी आहे. आमच्या मासाल्यांमुळे कोणताही त्रास होत नाही. सद्या महिला प्रत्येक क्षेत्रात आपल वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. त्यात उद्योग क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन महिला काम करतात. पूर्वी महिलेने फक्त चूल आणि मुल सांभाळण्याची प्रथा होती. मात्र, जस जसा शिक्षणाचा प्रचार प्रसार वाढत चालला तसी ती प्रथा महिलांनी मोडीत काढली आहे, अशी प्रतिकिया  शारदा डोखळे यांनी Local18 शी बोलताना दिली. महिन्याकाठी मिळतात दीड लाख  घरगुती मसाला उद्योगामध्ये महिन्याकाठी तब्बल दीड लाखांचा नफा मिळतो. सोबतच देशाबाहेर सुद्धा मसाल्याची विक्री केल्या जाते. हेही वाचा : Aurangabad : रूग्णांच्या नातेवाईकांवरही आजाराचं सावट; घाटी हॉस्पिटलचं धक्कादायक वास्तव, पाहा VIDEO घरगुती मसाल्याची वैशिष्टे : 1) हा मसाला बराच काळ टिकतो लवकर खराब होत नाही. 2) या मसाल्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. तसेच खाण्यासाठी देखील चविष्ट आहे. 3) मसाल्यात वापरला जाणारा प्रत्येक घटक हा आरोग्यासाठी उपाय कारक आहे. 4) मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात. खराब वस्तू वापरल्या जात नाही. 5) कोणत्याही केमिकल व्यतिरिक्त हा घरगुती मसाला तयार केला जातो. 6) फक्त व्यवसायाच साधन नाही तर आम्ही ग्राहकांचं हित जपतो. 7) जशी मागणी असेल तसाच माल उत्पादित करतो त्यामुळे माल फ्रेश असतो.

  गुगल मॅप वरून साभार...

  ऑर्डर करायची असल्यास येथे करा संपर्क आपल्याला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर 9270057065 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. आपल्यापर्यंत पार्सल देण्यात येईल. मसाला खरेदी साठी राजीवनगर (वडनेर रोड) खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या पत्त्यावर देखील भेट आपण देऊ शकता. शेतकऱ्यांना ही मिळाला दिलासा घरगुती मसाला उद्योगामुळे जवळच्या शेतकऱ्यांना ही चांगला दिलासा मिळाला आहे. आपला शेत माल बाजारात न विकता ते या महिलांनाच विकतात. त्यातून त्यांना चांगले पैसे ही मिळतात आणि त्यांचा बाजारात जाण्याचाही खर्च वाचतो.
  First published:

  Tags: Nashik, Success stories

  पुढील बातम्या