जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाचे खैरेंनी केलं अभिनंदन, म्हणाले....

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाचे खैरेंनी केलं अभिनंदन, म्हणाले....

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाचे खैरेंनी केलं अभिनंदन, म्हणाले....

कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 12 डिसेंबर : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर 10 डिसेंबरला शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी चंद्रकांत पाटलांना शाही लावणाऱ्या युवकाचे अभिनंदन केले आहे. लोकांचा राग होता आणि तो दिसला पाहिजे, असे म्हणत चंद्रकांत खैरेंनी त्या तरुणाचे अभिनंदन केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्घाटन झालेल्या सभागृहाचे चंद्रकांत खैरे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. वंदे मातरम सभागृहाचे शुक्रवारी उद्घाटन झालं होतं. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वंदे मातरम सभागृहात आज भारत मातेचे पूजन करत या सभागृहाची पाहणी केली. हेही वाचा -  Chandrakant Patil : विरोधकांनो कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा…’, चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीनंतर भाजपचा इशारा

तसेच शुक्रवारी जी लोक उद्घाटनासाठी आले होते त्यांनी यासाठी कष्ट घेतले नाही तर आम्ही कष्ट घेतले आहे. त्या दिवशी आम्ही आलो नव्हतो म्हणून आज आलो असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. तसेच ही कुरघोडी नाही. मात्र, आम्ही यासाठी आंदोलन केलेली आहेत म्हणून हा आमचा हक्क असल्याचा खैरे म्हणाले.

दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही शाईफेक  चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर चंद्रकांत  पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात