Home /News /maharashtra /

BREAKING : पंकजा मुंडे समर्थकांचा भाजप कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न, औरंगाबादेत तुफान राडा

BREAKING : पंकजा मुंडे समर्थकांचा भाजप कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न, औरंगाबादेत तुफान राडा

पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची आहे. त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

औरंगाबाद, 12 जून : विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना उमेदवारी न देण्यात आल्याने भाजपातील (BJP) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. पंकजा यांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची आहे. त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. मुंडे समर्थकांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याची बातमी ताजी असताना आखणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज भाजप मंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा (stone pelting) प्रयत्न केला. पंकजा यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले. त्यामुळे प्रचंड राडा झाला. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं देत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकाने दोन दिवसांपूर्वी थेट आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज बीड जिल्ह्यात प्रवीण दरेकर यांचा दोन ठिकाणी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हेही असे की थोडके आज संध्याकाळी औरंगाबादेत तुफान राडा झाला. भाजप नेते भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर पंकजा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील समोरासमोर आले. त्यामुळे तणाव वाढला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने औरंगाबादेत मोठी दुर्घटना टळली. मुंडे समर्थकांचा प्रवीण दरेकरांना ताफा अडवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. ('मीही तुमची वाट पाहत असतो, पण...',राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, VIDEO) प्रवीण दरेकर हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुढे निघत असताना पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गाडी न रोखल्याने पंकजा समर्थक थेट गाड्यांसमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. भाजपकडून मुंडे बाहिणींवर अन्याय होतोय. यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर आता पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आला, अशी भूमिका मुंडे समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंडे समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावललं विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी बुधवारी (8 जून) जाहीर (BJP candidates list announced for MLC Election) केली आहे. या यादीत एकूण पाच उमेदवारांची नावे आहेत. भाजपकडून विधानपरिषदेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नव्हता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे केंद्र भाजपने घोषित केले आहेत. आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं, पंकजा ताई या ऑलरेडी ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत. मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या