जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'मीही तुमची वाट पाहत असतो, पण...',राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, VIDEO

'मीही तुमची वाट पाहत असतो, पण...',राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, VIDEO

 राज ठाकरेंचा दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे आणि याच आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरेंचा दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे आणि याच आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरेंचा दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे आणि याच आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जून :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. आज राज ठाकरे यांनी एक ऑडिओ प्रसिद्ध करून पुढे ढकलेली शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती दिली. तसंच, 14 तारखेला वाढदिवस आहे, त्यामुळे कृपया करून घरी घेऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून पायाच्या व्याधीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना 31 मे रोजी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये ( Lilavati Hospital mumbai)  दाखल करण्यात आले होते. पण, कोविडचे डेड सेल असल्याचे सांगत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलली.

राज ठाकरेंचा दोन दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे आणि याच आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ‘पुण्यात आपली सभा झाली, त्यावेळी मी सगळ्यांना सांगितलं होतं, माझी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. त्यानंत डॉक्टरांनी कोविडच्या डेड सेल असल्याचे सांगितले. त्यामुळे घरी यावं लागलं आणि शस्त्रक्रिया रद्द करावी लागली होती. त्यामुळे कोविडच्या नियमाप्रमाणे क्वारंटाईन आहे. आता 14 तारखेला माझा वाढदिवस आला आहे. मोठ्या उत्साहाने सर्वजण घरी येतात. मलाही तुम्हाला भेटायला आवडते. मीही तुमची वाट पाहत असतो. पण, यावेळी मला तुम्हाला भेटता येणार नाही. कुणाला म्हणजे, कुणालाच भेटता येणार नाही. जर या भेटीगाठीतून पुन्हा कोरोनाची लागण झाली तर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागेल. त्यामुळे किती पुढे ढकल्याचे यालाही मर्यादा असते. पुढच्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे यावेळी कुणालाही भेटता येणार नाही. एकदा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर मी तुम्हाला नक्की भेटेल, पण 14  तारखेला कृपया घरी येऊ नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात