मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मला मरायचं, मदत करू नका' म्हणत भर रस्त्यावर तरुणाने काचेनं कापला स्वत:चा गळा

'मला मरायचं, मदत करू नका' म्हणत भर रस्त्यावर तरुणाने काचेनं कापला स्वत:चा गळा

एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला

एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला

एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 06 डिसेंबर : औरंगाबादमधून एक धक्कादायक आणि मनविचलित करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने भर रस्त्यावर उभं राहुन स्वत:चाच गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक क्षेत्रात हा प्रकार घडला आहे. भर रस्त्यात काचेच्या तुकडा घेऊन एक तरुण उभा होता. बराच वेळ तो उभा होता त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा करायला लागला. मला जगायचं नाही, मला मदत करू नका, असं म्हणत या तरुणाने स्वतःचाच गळा कापला.

(दुकान बंद करून घरी निघाला पण पोहचलाच नाही; सराफा व्यापाऱ्यासोबत घडले भयंकर कृत्य)

एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला. काही जणांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

(महिलेने केली पोटच्या मुलाची हत्या, तुरुंगात गेल्यावर उचललं आणखी भयानक पाऊल)

घटनास्थळी पोलिसांच्या दामिनी पथकाने धाव घेतली आणि या तरुणाला ताब्यात घेतलं, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दामिनी पथकाने रक्तबंबाळ अवस्थेत या तरुणाला उपचारासाठी दाखल केले आहे. हा तरुण गुजरात इथं राहणार आहे. आत्महत्या करण्याच्या तयारीत असणारा हा तरुण वेडसर असल्याच चौकशीत समोर आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन  भर चौकात पत्नीच्या डोक्यात घातले फावडे

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बायकोवरील संशयाच्या कारणावरून भर चौकात डोक्यात फावडे मारून हत्या केली आहे. आरोपी पती ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ असे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: Marathi news