औरंगाबाद, 31 ऑक्टोबर : अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. अशा या पेच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेरीस या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांसह पैसे मागण्साठी आलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये मागितले जात होते. न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाचा वाचा फोडली. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात होती.
शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार pic.twitter.com/tsw6wjt4UX
— News18Lokmat (@News18lokmat) October 31, 2022
अखेर या व्हिडीओची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दखल घेतली. शेतकऱ्यांना पंचनामे साठी पैसे मागणारा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. रोहिणी सुभाष मोरे कृषी सहाय्यक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसंच, चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह कर्मचारी निलंबित करण्याात आले आहे. काय आहे प्रकरण? नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. एका सजग शेतकऱ्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एकरी 400 रुपये मागितले जात आहे. एवढंच नाहीतर या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी पैसे दिले याची यादीही दाखवत आहे. या चर्चेदरम्यान एका जयश्री नावाच्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा घेतले जात आहे. (शिंदे सरकारला केंद्राकडून गिफ्ट, महाराष्ट्रात येणार आता 2 नवे प्रकल्प!) या प्रकरामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कामगार तलाठी आणि ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ( ‘पंतप्रधान मोदी हे देशाचं, त्यामुळे…‘प्रकल्पांबद्दल राज ठाकरे स्पष्टच बोलले ) विशेष म्हणजे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसान ग्रस्त भागाचा दौरा केला होता, त्यावेळी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार समोर आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.