औरंगाबाद, 18 ऑक्टोबर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांना अति रक्तदाब त्रास सुद्धा झाला. त्यामुळे रात्रीच त्यांना शहरातील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर आता अधिक उपचारासाठी एअर अम्ब्युलन्सने मुंबईला रवाना झाले आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री अचानक छाती दुखू लागले. त्यांना तातडीने शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिरसाट यांना सिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. तसंच उच्च रक्तदाबाचा त्रासही जाणवला. संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी सूत्र फिरवली. (दाताची सर्जरी सुरू असताना गेली लाईट, मोबाईलच्या टॉर्चमध्ये पार पडली शिंदे सरकारच्या मंत्र्याची सर्जरी) संजय सिरसाट यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादला तातडीने एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यानेच सिरसाट यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. (’…म्हणून भाजपने माघार घेतली’, शिवसेनेचा मोठा दावा, राज ठाकरेंही मानले आभार) संजय सिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे.सोमवारी छातीत दुखत असल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने औरंगाबाद मध्ये सिग्मा रुग्णालयात केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.