औरंगाबाद, 17 ऑक्टोबर : अचानक वीज जाणे हे सर्वसामान्यासाठी अतीसामन्य आहे. पण, जर दाताची शस्त्रक्रिया सुरू असेल आणि अचानक वीज गेली तर काय होईल. राज्याचे रोहयो मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत असाच प्रसंग घडला आहे. या घटनेमुळे मंत्रिमहोदय कमालीचे संतापले होते. त्याचं झालं असं की, राज्याचे रोहयो मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे एका वेगळ्याच संकटाचा सामना कराव लागल्याची घटना समोर आली. भुमरे यांची औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्या दाताची सर्जरी होणार होती. त्यानुसार, भुमरे हे सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल झाले. पण, सर्जरी सुरू सुरू असतानाच, अचानक लाईट गेल्याचा प्रकार समोर आला. अचानक लाईट गेल्यामुळे भुमरे यांची शस्त्रक्रिया थांबवावी लागली. गमंत म्हणजे, सरकारी रुग्णालयात जनरेटर नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. (अंधाऱ्या खोलीत खांद्यावरील तो हात कुणाचा? राज ठाकरेंनी सांगितला शिवनेरीवरील अंगावर काटा आणणारा अनुभव) मग काय सर्जरी सुरू असताना नेमकं काय करावं,डॉक्टरांना सुचेनास झाले. पण, शो मस्ट गो ऑन म्हणत डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मंत्रीमहोदयांची शस्त्रक्रिया सुरू झाली. थोड्याच वेळात लाईट येईल अशी अपेक्षा ठेवून सर्जरी झाली पण शेवटपर्यंत काही वीज आलीच नाही. (Andheri East Bypoll : भाजपवर दबाव!, अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदेंचा शिलेदारही ठाकरे-पवारांच्या बाजूने) त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये संदीपान भुमरे यांच्या दातावर सर्जरी पार पडली. विशेष म्हणजे, लाईट गेल्यावर देखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्याने भुमरेंनी संताप व्यक्त केला. जर एखाद्या मंत्र्याला शासकीय रुग्णालयात हा अनुभव आला असेल तर सर्वसामान्य रुग्णांचे काय होत असेल अशी चर्चा रुग्णालय परिसरात रंगली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.