सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 13 जानेवारी : सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. आता याचेच परिणाम हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेवर झाला की काय, असा सवाल निर्माण झाला आहे. बावनकुळे भाषण करत असताना भाजपच्या मंत्र्यांपासून ते पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर डुलक्या मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचं झालं असं की, चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. विधान परिषद मतदासंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिक्षक परिषद उमेदवार प्रा. किरण पाटील यांची प्रचार सभा पार पडली.यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह खासदार आणि अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.
पण, बावनकुळे यांचं भाषण लांबलं आणि नेत्यांना झोप काही कंट्रोल झाली नाही. अतुल सावे यांनी डोळे लावून घेतले आणि मस्त अशी झोप मारली. आता सावे यांनी डोळे बंद करून घेतल्यामुळे बाजूला बसलेले भागवत कराड यांनाही झोप काही डोळ्यात मावत नव्हती. ते कसे बसे स्वत: ला सावरत होते. बरं एवढंच नाहीतर, त्याच्या मागे बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपण कुणाला दिसत नाही, असं मनाशी पक्क करून डोळे बंद करून घेतले. मात्र, समोर रांगेत बसलेल्या नेत्यांना काही करता झोप आवरता आली नाही. अनेक जण जांभई देऊन कसं बसं स्वत: ला कंट्रोल करत होते. (‘पाकळ्या मिटून घेण्याचं नवं कमळ ऑपरेशन’; दिलीप वळसे पाटलांनी भाजपला पुन्हा डिवचलं) पण, दुसरीकडे बावनकुळे यांनी सर्वांकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं भाषण पूर्ण केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पूर्ण पक्ष रिकामा होईल, शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठे नाव आहे, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ( रस्त्यावर खाल्लं सँडविच; फडणवीसांची भेट घेताच कुठे गेले ब्रिटीशचे हाय कमिश्नर? ) विधान परिषद निवडणुकीतून शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही, मी रोज एकनाथ शिंदेंसोबत बोलतो, सगळ्यांना बोलूनच उमेदवार अंतिम होत आहे. धुसफूस आमच्यात नाही तर महाविकास आघाडीत आहे. नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले आहे ते भांडताय, आमच्यात पूर्ण समन्वय आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केला.