भारतातील ब्रिटनचे हाय कमिश्नर ॲलेक्स एलिस यांनी नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
मुंबईत आल्यावर ॲलेक्स स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतानाही दिसले. याचे फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत.
ॲलेक्स यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ते मुंबईचे सॅंडविच आणि मिरची खाताना दिसत आहेत.
काही क्षणातच एलिस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि फोटोंवर खूप साऱ्या कमेंटही येत आहेत.
एलिस यांना मुंबईच्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना पाहून नेटकरी त्यांना खाण्यासाठी आणखी स्पेशल जागा सुचवत आहेत.