जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Crime : बहिणीला सतत मारहाण, दारुडा भावोजीसोबत मेहुण्याने केलं 'हे' विकृत कृत्य

Aurangabad Crime : बहिणीला सतत मारहाण, दारुडा भावोजीसोबत मेहुण्याने केलं 'हे' विकृत कृत्य

Aurangabad Crime : बहिणीला सतत मारहाण, दारुडा भावोजीसोबत मेहुण्याने केलं 'हे' विकृत कृत्य

मृत सुधाकर चिपटे याला दारुचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन आपल्या पत्नीशी वाद घालायचा.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 6 जून : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी (Maharashtra Crime News) वाढत आहे. खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एका मुलाने आईवडिलांचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे घटना - बहिणीला सतत त्रास देणाऱ्या भावोजीची मेहुण्यानेच हत्या (Person Killed Sister’s Husband) केल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील हिमायतबाग कट्टा (Himayatbag Katta) परिसरात डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या मृतदेहासंदर्भात चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. रविवारी एक मृतदेह पोलिसांनी जळालेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर तपास करत अवघ्या एक दिवसात आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुधाकर नारायण चिपटे (43, रा. सांगले कॉलनी) असे मृताचे नाव आहे. तर राजेश संतोष मोळवडे, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत सुधाकर चिपटे याला दारुचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन आपल्या पत्नीशी वाद घालायचा. तिला मारहाणही करायचा. या सर्व प्रकाराला त्याची पत्नी अक्षरश: कंटाळली होती. दरम्यान, या महिलेचा भाऊ राजेश मोळवडे हा सहा महिन्यांपूर्वीच आपल्या बहिणीच्या घराच्या शेजारीच राहायला आला होता. खासगी वाहनावर चालक असलेल्या भावोजीकडून बहिणीला सतत होणाऱ्या मारहाणीमुळे राजेश मोळवडे याला प्रचंड राग येत होता. त्यामुळे त्याने आपल्या भावोजीला संपवण्याचाच निर्णय घेतला. यानंतर त्याने शनिवारी घरी कुणीच नसल्याची संधी साधली आणि सुधाकर याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आधी सुधाकरचा मृतदेह एका पांढऱ्या गोणीत टाकला. त्यानतंर तो मृतदेह घेऊन हिमायतबाग येथे गेला. यानंतर ती गोणीत असलेला मृतदेह गोणीसह पेटवून दिला. मात्र, ही घटना जिथे घडली तिथे जवळच एक फार्म हाऊस आहे. येथील एक कामगार रात्री दीडवाजेच्या सुमारास लघुशंकेला उठला असता त्याला आग लागल्याचे दिसले. यानंतर ही घटना समोर आली. हेही वाचा -  फेसबूक फ्रेंड दलित असल्याचं कळताच तरुणीकडून बेदम मारहाण, विष पाजलं; तरुणाचा मृत्यू पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात एक व्यक्ती त्यांना दिसला. या व्यक्तिची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान, भावोजीकडून बहिणीला सतत मारहाण होत होती. यामुळे मेहुण्यानेच भावोजीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात