जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दारू पाजली, मग जेवू घातलं अन् शेवटी...; पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राला संपवलं

दारू पाजली, मग जेवू घातलं अन् शेवटी...; पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राला संपवलं

दारू पाजली, मग जेवू घातलं अन् शेवटी...; पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राला संपवलं

पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राला संपवलं असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडला

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, औरंगाबाद 25 नोव्हेंबर : मैत्रीचं नातं हे अतिशय खास असतं, असं म्हटलं जातं. रक्ताचं नसलं तरीही या नात्यात प्रेम, आदर, काळजी हे सगळंच असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात या नात्याचं महत्त्व वेगळंच असतं. मात्र, आता याच खास नात्याला काळिमा फासणारी एक घटना औरंगाबाद मधून समोर आली आहे. या घटनेत मित्रानेच मित्राच्या डोक्यात लोखंडी टॉमी घालून त्याची हत्या केली. या हत्येचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे. लग्नाच्या वाढदिवशी पत्नी वाट बघत होती, पण पती परतलाच नाही; भाजप नगसेवकासोबत घडलं भयानक पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राला संपवलं असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत दोन जिवलग मित्र एका हॉटेलमध्ये सोबत दारू प्यायले यानंतर ते सोबतच घरी गेले. इथपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. मात्र, पुढे जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं. हॉटेलमध्ये सोबत दारू प्यायल्यानंतर ते घरी गेले आणि सोबतच जेवणही केलं. त्यानंतर यातील एका मित्राने पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या डोक्यात लोखंडी टॉमी घालून त्याची हत्या केली. फारुख खान इब्राहिम खान पठाण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात हत्या करणाऱ्या राजपूत पती-पत्नीला सिल्लोड पोलिसांनी घटनेनंतर 2 तासात अटक केली आहे. आणखी एक ‘श्रद्धा’! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड पुण्यातही तरुणाला रस्त्यावरच जबर मारहाण - नुकतीच पुण्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री फायरिंगची घटना घडली आहे. या घटनेत पूर्ववैमान्यातून दोन गटात राडा झाला. या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात काही आरोपींनी तरुणाला जबर मारहाण केली. यानंतर यातील एक आरोपीने बंदूक बाहेर काढून हवेत गोळीबार केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात