मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दुर्दैवी! सरावादरम्यान अचानक चक्कर येऊन पडला; औरंगाबादमध्ये अग्निवीर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

दुर्दैवी! सरावादरम्यान अचानक चक्कर येऊन पडला; औरंगाबादमध्ये अग्निवीर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

करण नामदेव पवार

करण नामदेव पवार

शासकीय रुग्णालय औरंगाबाद इथे उपचार सुरु असताना आज दुपारी तरुणाचं निधन झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट: अग्निपथ योजनेंतर्गत, भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबाद इथे चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे राज्यभरातून तरुण तिथे दाखल झाले आहेत. त्यात ऐन पावसाळ्यात तरुणांना राहायला खायला जागा नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. त्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

काल रात्री 12 वाजताच्या सुमारास चाचणीचा शेवटचा ग्राऊंड काढत असतांना अचानक चक्कर येऊन एक तरुण खाली कोसळला. त्याला शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलं. शासकीय रुग्णालय औरंगाबाद इथे उपचार सुरु असताना आज दुपारी तरुणाचं निधन झाल्याची घटना घडली आहे.

करण नामदेव पवार( वय 21) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण विठ्ठलवाडी ता. कन्नड इथला रहिवासी आहे अशी माहिती मिळाली आहे. अग्निवीर भरतीसाठी हा औरंगाबादला आला होता. कारण पवार याच्या पार्थिवावर आता शवविच्छेदन सुरु असायची माहिती मिळत आहे.

युट्यूबर पत्रकाराने तरुणीची केली हत्या, whats app ग्रुपवर सांगितलं खून केला, औरंगाबाद हादरलं

गेल्या काही दिवसांआधीही सराव करताना अशाच एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अग्निवीर भरतीसाठी देशातील तरुण खरंच शाररिरीक रित्या सक्षम आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

तरुणांचे होताहेत हाल

अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरांमध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला होता. (Agniveer Recruitment Aurangabad) औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरू आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागली. त्यामुळे रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे भावी जवानांचे कसे हाल सुरू आहेत ही परिस्थिती समोर आली आहे.

नाशिक : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् शेवटी झोपेत असतानाच घोटला पत्नीचा गळा

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत सैन्य दलाला जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जात आहे. सैन्य दलाच्या अग्नीवीर भरती प्रक्रियानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Maharashtra News