अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 17 ऑगस्ट : औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने एका तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच दोन दिवसाअगोदर खून करुन मृतदेह खोलीतच कोंडून ठेवला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आज सकाळी हा तरुण मृतदेह एका कारमधून घेऊन पसार झाला. तरुणी ही जालना जिल्ह्यातून एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेली होती. मात्र, एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने या तरुणीचा खून केला. तसेच यानंतर खुनी पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन आणि पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर याबाबक माहिती पाठवून खुनाची कबुली दिली आहे. आरोपी खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली. प्रेम प्रकरणातून खून झाल्याची चर्चा - या प्रकरणातील हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव अनिता असे होते. तर आरोपी तरुणाचे नाव हे सौरभ लाखे असे आहे. या दोघांची एंगेजमेंट झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दल सविस्तर माहिती आलेली नाही. तर हा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा, अशी शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिक व्यक्त करत आहेत. खून झालेल्या तरुणीचा आणि आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांची चांगलीच जवळील असल्याचे सांगून जातो. शेजाऱ्यांनी दिलेली माहिती अशी - अंकिता असे या तरुणीचे नाव होते, तसेच ती जालना येथील रहिवाशी असल्याची माहिती तिने दिली होती, असे शेजारच्या महिलेने सांगितले. ती एकटीच राहत होती. आम्ही वर राहत होतो. ती खाली राहत होती. एक दोनदा या तरुणाला तिकडे पाहिले होते. तसेच ती सोमवारी पासून त्या तरुणीला पाहिले नाही. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तो तिचा मृतदेह घेऊन जाताना दिसला, अशी माहिती येथील शेजारील महिलेने दिली आहे. हेही वाचा - नाशिक : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् शेवटी झोपेत असतानाच घोटला पत्नीचा गळा तसेच ही घटना तीन-ते चार दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज या शेजारील महिलेने व्यक्त केला आहे. कालपासून या घरात वास येत होता. सकाळी दरवाजा उघडायला आले, तेव्हा त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात माशा दिसत होत्या. तसेच या तरुणावर त्यांना संशय आल्यावर त्यांनी त्याला थांबवून त्याची संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तेथून त्याने पोबारा केला, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.