अविनाश कानडजे (औरंगाबाद) औरंगाबाद, 21 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात लव्ह जिहादवरुन वातावरण तापू लागलं आहे. लव्ह जिहाद प्रकरणात अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना लग्नासाठी मुस्लिम बनवलं असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. मात्र, औरंगाबादेत एक वेगळंच प्रकरण पुढ आलंय यात, मुस्लिम मुलीचं एका हिंदू मुलांसोबत प्रेम संबंध होते. त्यातून लग्नापूर्वी तरुणाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण केल्याचा, कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलाच तापत आहे. औरंगाबादेत राहणारा दीपक सोनवणे, बीई मेकॅनिकल इंजिनिअर आहे. 2018 मध्ये त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुस्लिम तरुणीशी त्याची ओळख झाली होती, यातून दोघांचं प्रेम झालं. 2020-21 दरम्यान त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या घरच्यांनी याबाबत तरुणाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल, अशी अट घातली. त्याने नकार दिल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अतोनात छळ सुरू केल्याचा आरोप या तरुणाने केलाय. त्याला त्याच्या घरातून उचलून नेत दोन दिवस डांबून ठेवले, मुलीच्या वडिलांनी अतोनात मारले, इतकच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांचाही अनन्वित छळ केला. मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून खोट्या तक्रारी पोलिसात देऊन आम्हाला जेलमध्ये टाकलं असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. वाचा - प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड पीडित तरुणाकडून 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप आतापर्यंत या मुस्लिम कुटुंबीयांनी तरुणाकडून 11 लाख रुपये उकळल्याचं या मुलाचं म्हणणं आहे, इतकच नाही तर मुस्लिम धर्म स्वीकारन्यावरुन बळजबरीने सुंता केल्याचाही आरोप पीडित तरुणाने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे यात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या पीडिताने केला आहे.
भाजपकडून आरोपींवर कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणाला गंभीर घेत राजकारण तापलं आहे. भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. हा प्रकार गंभीर असून आरोपींवर कारवाईची मागणी भाजपच्या शिष्ट मंडळांने केली. महत्त्वाचं म्हणजे या शिष्टमंडळात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे देखील होते. या संपूर्ण प्रकरणात एसीपी दर्जाचा अधिकारी आता चौकशी करत असल्याचं पोलीस आयुक्तांचे म्हणणं आहे. चौकशीच्या अहवालानंतरच यात काय तथ्य आहे हे सांगता येईल असं पोलिसांनी सांगितले.