परभणी, 7 ऑक्टोबर : परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याने वासरावर हल्ला करून वासरू फस्त केले. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील गव्हाळी इटोली शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिली असून वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारामध्ये मागील काही दिवसापासून बिबट्याचा वावर होत आहे. बिबट्या पशुधनावर हल्ला करून त्यांना फस्त करत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी अगोदरच दहशती खाली आहेत. अशातच बिबट्याने जिंतूर तालुक्यातील गव्हाळी इटोली शिवारामध्ये एका वाचनावर हल्ला करून सदरील वासरू फस्त केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतामध्ये कामाचे दिवस असतानाच बिबट्या हल्ला करत असल्याच्या घटना घडल्याने शेतकरी विशेषतः महिला शेतकरी शेतामध्ये जाण्यास धजावत आहेत. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली असून वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान सदरील बिबट्याला पाहिले असल्याचे गावकरी दावा करत आहेत. हेही वाचा - कुत्र्याच्या शिकारीसाठी आला अन् थेट घरात घुसला बिबट्या; पुढे जे घडलं ते थरारक, साताऱ्यातील घटनेचा Video त्यामुळे लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याला ताब्यात घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.