जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर!

अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर!

अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर!

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ Latur,Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 12 जानेवारी : लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हटलं निलंगेकर यांनी?  निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना निलंगेकर यांनी म्हटलं की, जरी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षा घेणार नाही. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हेही वाचा :  बाळासाहेबांच्या तैलचित्रावर ठाकरेंची शिवसेना नाराज, शिंदेंचा पलटवार, वाद पेटणार! काँग्रेसला मोठा धक्का बसणार?  लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं मोठं वर्चस्व आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र आता अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य निलंगेकर यांनी केलं आहे. अमित देशमुखांनी कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात