बीड, 08 ऑगस्ट : स्ट्रीट फूडच्या (Street food) बाबतीत बीड देखील आता मागे राहिले नाही. बीडमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यातील एक फेमस स्ट्रीट फूड म्हणजे कच्छी दाबेली (Dabeli). असे मानले जाते की ही लोकप्रिय डिश प्रथम गुजरातमध्ये बनविली गेली. गुजरातनंतर मुंबई पुण्याच्या दाबेलीने प्रसिद्धी मिळवली. मात्र, खवय्यांसाठी हीच दाबेली बीडमध्ये देखील उपलब्ध असून बीडकर या स्ट्रीट फूडचा आवडीने आस्वाद घेतात. 20 वर्षापूर्वी हरीश पढधरीया यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर दाबेलीचा छोटा हॉटेल सुरू केला. व्यवसाय सुरू केला तेव्हा गुजरातमध्ये चवीने खाल्ली जाणारी दाबेली बीडमध्ये लोक खाण्यासाठी येतील का हा प्रश्न होताच. मात्र, मोठ्या हिमतीने पढधरीया यांनी दाबेली बनवण्याचा निर्णय घेतला पण या दाबेलीत कांदा लसूण वापरणे टाळले. यालाचा त्यांनी जैन दाबेली असं नाव दिलं. हेही वाचा-
दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO
खवय्यांच्या वेळेनुसार दाबेली सेंटरचा वेळही संध्याकाळी चार ते रात्री दहा पर्यंत असतो. दाबेलीसाठी पावाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या पावात स्पेशल मसाला, डाळिंब, शेंगदाणे याचबरोबर पुदिन्याची चटणी आणि आंबट गोड पाणी घातले जाते. त्यानंतर बटर लावून ही दाबेली तव्यावर भाजली जाते. दाबेली शेव, कांदा टाकून सजवली जाते पण बीडमधील स्वराष्ट्र स्नॅक सेंटर मधील दाबेली कांदा, लसूण विरहीत असते. तरीही दाबेली तितकीच चवदार लागते आणि खवय्येही दाबेली पसंद करतात. 400 ते 450 दाबेल्यांची विक्री व्यवसायाबद्दल बोलताना हरीश पढधरीया सांगतात की, वीस वर्षांपूर्वी एका छोट्याशा पत्रा स्टॉलमध्ये आम्ही दाबेलीची सुरूवात केली. जिल्ह्यात पहिल्यांदा कच्ची दाबेली आम्ही सुरू केली. त्यावेळची किंमत 3 रुपये होती. आज 25 रुपयांना दाबेली मिळते. दिवसाकाठी 400 ते 450 दाबेली विक्री होतात. हेही वाचा-
उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी
हाॅटेलचा पत्ता श्री सौराष्ट्र स्नॅक्स सेंटर, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स स्टेडियम रोड संपर्क क्रमांक- 9822607551
गुगल मॅपवरून साभार झणझणीत दाबेली मला इतरत्र नाहीच खवय्या मानसी कुलकर्णी दाबेली विषयी सांगते की, मी अनेक शहरांमध्ये दाबेली हा पदार्थ खाल्ला आहे. मात्र बीडमध्ये मिळणारी या दाबेलीची चव काही न्यारीच आहे. मी सातवीच्या वर्गात असल्यापासून या ठिकाणी येते. तर वैष्णवी चौधरी सांगतात की, मी पुणे येथे जॉब करते. तेथे देखील दाबेली खाल्ली आहे. मात्र बीडमध्ये मी आले की दाबेली खायची असेल तर याच ठिकाणी येते. यासारखी चविष्ट आणि झणझणीत दाबेली मला इतरत्र कुठेही खायला मिळाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.