जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मानवी दुधात आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण; गरोदर महिला, स्तनदा मातांना संशोधकांनी दिला 'हा' सल्ला

मानवी दुधात आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण; गरोदर महिला, स्तनदा मातांना संशोधकांनी दिला 'हा' सल्ला

मानवी दुधात आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण; गरोदर महिला, स्तनदा मातांना संशोधकांनी दिला 'हा' सल्ला

बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम मानलं जातं; मात्र या संदर्भात नुकतीच एक अतिशय आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम मानलं जातं; मात्र या संदर्भात नुकतीच एक अतिशय आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. मानवी दुधात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. याचाच अर्थ मातेच्या दुधातून मायक्रोप्लास्टिक बाळाच्या शरीरात जात आहे. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मानवी दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. हे कण पॉलिथिलिन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीन यांसारख्या घातक रसायनांपासून तयार झालेले असतात, असं पॉलिमर जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी प्लास्टिकच्या वस्तू वापरणं कटाक्षानं टाळावं, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. त्याचप्रमाणे सिंथेटिक कापडदेखील वापरू नये, असंही संशोधकांनी सांगितलं आहे. ‘मिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संशोधकांनी इटलीत रोममध्ये एक आठवड्यापूर्वी जन्म दिलेल्या 34 निरोगी मातांच्या दुधाचा नमुना घेऊन त्याचं सूक्ष्म विश्लेषण केलं. या विश्लेषणात 75 टक्के दुधात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले. याआधीच्या अभ्यासात मायक्रोप्लास्टिकचा मानवी पेशी, सागरी जीव आणि प्राण्यांवर होणारा विषारी परिणाम अधोरेखित करण्यात आला होता. प्लास्टिकमध्ये अनेकदा फेथ लेट्ससारखी घातक रसायनं असतात. मानवी दुधात यापूर्वीही ही रसायनं आढळून आली आहेत. 2020 मध्ये इटालियन संशोधकांना महिलांच्या गर्भनाळेतही मायक्रोप्लास्टिक आढळून आलं होतं. ( ब्रिटनच्या संसदेत आली रोबो आर्टिस्ट; राणी एलिझाबेथसह काढलीत अनेकांची चित्र ) प्लास्टिक टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी काय करावं? युनिव्हर्सिटी पॉलिटेसिनिया डेले मर्चेच्या प्राध्यापक डॉ. व्हॅलेंटिना नोटार्स्टेफानो यांनी सांगितलं, की, `आमचा अभ्यास खूपच लहान स्वरूपाचा आहे आणि याचा थेट संबंध महिलांना प्लास्टिकच्या संपर्कात येण्याशी नाही. परंतु, प्लास्टिकमुळे मानवाचं किती मोठं नुकसान होतं हे यापूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी प्लास्टिकच्या भांड्यातलं अन्न खाणं किंवा प्लास्टिकच्या भांड्यातलं पाणी पिणं टाळावं. दुसऱ्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे, की प्लास्टिकचं भांडं गरम केलं तर त्यात ठेवलेली कोणतीही वस्तू दूषित होते आणि त्यामुळे मायक्रोप्लास्टिक पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांना कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकशी संपर्क टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्तनदा मातांना सौंदर्यप्रसाधनं आणि टूथपेस्टचा वापर टाळण्यासदेखील सांगितलं आहे. तसंच सिंथेटिक कापडाचा वापर टाळावा, असाही सल्ला दिला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात