जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video: 24 तासांमध्ये कसा लागला बिंदास काव्याचा शोध? पाहा Inside Story

Video: 24 तासांमध्ये कसा लागला बिंदास काव्याचा शोध? पाहा Inside Story

Video: 24 तासांमध्ये कसा लागला बिंदास काव्याचा शोध? पाहा Inside Story

गणेश विसर्जनाच्या गडबडीमध्ये सर्व जण असताना औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर (YouTube) बिंदास काव्या (Bindass Kavya) घरातून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली होती

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 10 सप्टेंबर :  गणेश विसर्जनाच्या गडबडीमध्ये सर्व जण असताना औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर (YouTube) बिंदास काव्या (Bindass Kavya) घरातून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.  16 वर्षांच्या काव्याचे यूट्यूबवर 4.35 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक व्हिडीओची फॅन्समध्ये उत्सुकता असते. यूट्यूब व्हिडीओमुळे ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळालेली काव्या अचनाक का आणि कुठे गायब झाली? हाच प्रश्न सर्वांना पडला होता. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले होते. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) अवघ्या 24 तासांच्या आत काव्याचा शोध लावला. काव्या तिचा मोबाईल देखील घरी ठेवून गेली होती. त्यामुळे हा शोध लावणे अधिक आव्हानात्मक होते. काव्याच्या शोधाची इनसाईड स्टोरी (Inside Story) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तपास अवघड होता पण… काव्या शुक्रवारी अचानक घरामधून बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी ही तक्रार दाखल केली. अनंत चतुर्दशीचा दिवस असल्यानं शहरातील सर्व पोलीस विसर्जन मिरवणुकीच्या ड्यूटीमध्ये व्यस्त होते. त्यावेळी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तपासाची सर्व सुत्रं हाती घेतली. रागाच्या भरात घर सोडून गेलेली काव्यानं मोबाईल घरामध्येच ठेवला होता. त्यामुळे तिचे लोकेशन शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यावेळी काव्याच्या पालकांनी दिलेली माहितीच्या आधारवर पोलिसांचे सायबर सेल कामाला लागले. त्यांनी केलेल्या तपासात काव्या मध्य प्रदेशला जात असल्याचं लक्षात आले.  काव्या रेल्वेने मध्य प्रदेशात जात आहे, असा पोलिसांचा अंदाज होता.

    महाराष्ट्रातून रोज शेकडो रेल्वे मध्य प्रदेशात जातात. त्यामुळे नेमक्या कोणत्या रेल्वेत काव्या आहे हे आव्हान होते. त्यावेळी पोलिसांनी पुरेसा होमवर्क करत काव्याची माहिती RPF ( Railway protection force) च्या टिमला दिले. महाराष्ट्र रेल्वे पोलीस आणि रेल्वे विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काव्याची शोध मोहीम सुरू झाली. या तपासामध्ये काव्या तिचा YouTube वर झालेला आणि लखनऊमध्ये राहाणाऱ्या मित्राकडे जात असल्याची माहिती समजली, काव्या खुशीनगर एक्स्प्रेसनं प्रवास करत होती. तसंच तिच्या रेल्वेनं मध्य प्रदेशातील खांडवा शहर ओलांडले असल्याचीही पोलिसांना कळाले होते. या सर्व माहितीच्या आधारे RPF च्या टिमनं काव्याला ताब्यात घेतले. ‘आय लव्ह यू’ ऐकण्यासाठी रोमिओ झाला वेडा, विवाहित महिलेनं शिकवला चांगलाच धडा काय होते कारण? काव्याचा अभ्यासाच्या मुद्यावर आई-वडिलांशी वाद झाला होता. या भांडणामध्येच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी तात्काळ सर्व सुत्रं हाती घेत काव्याचा तपास केला. त्यामुळे 24 तासांच्या आत तिचा शोध लागला. याबद्दल तिच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

    कोण आहे काव्या? काव्या औरंगाबादच्या पाडेगावमध्ये राहते. तिने सुरूवातीला टिक टॉकवर व्हिडीओ करत असे. या व्हिडीओंना जोरदार प्रतिसाद मिळाल्यानं ती सेलिब्रेटी बनली. तिचे टिक टॉक आणि इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले. त्याचाच फायदा घेत तिनं 2017 साली स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू केले. तिचे बिंदास काव्या हे यूट्यूब चॅनेल देखील लोकप्रिय असून तिचे यूट्यूबवर 4.35 मिलियन फॉलोअर्स आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात