अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 08 सप्टेंबर : बसंतीसाठी विरू पाण्याच्या टाकीवर चढला होता, शोले सिनेमात हे दृश्य जवळपास सर्वांनीच पाहिलंय. पण, औरंगाबादमध्ये एका महाभागाने तरुणीला मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे बॅनर गल्लीत लावले अशी धमकीच दिली. अखेर पोलिसांनी या रोमिओला चांगलाच धडा शिकवला. ‘मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल व्हायरल करेल’ अशी धमकी महिलेला देणाऱ्या एका तरुणावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दाभाडे असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी सचिन दाभाडे हे एकाच गल्लीत राहतात. सचिनने फिर्यादीची जवळीक निर्माण केली. त्यानंतर वारंवार संपर्क साधून आय लव्हा यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायरल करेल अशी धमकी दिली. (चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, जळगावातील संतापजनक घटना) फिर्यादी महिला ही विवाहित आहे. सचिन दाभाडे याने जवळीक साधून तिच्याकडून तुझ्या नवऱ्या विषयी तुला काही सांगायचे आहे असे सांगून व्हॉट्सअप क्रमांक इंस्टाग्राम, आयडी आणि पासवर्ड घेतला होता. त्यानंतर त्याने या महिलेली धमकी देण्याचे सत्र सुरू केले. (धक्कादायक! टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून सूनेनं चावली सासूची 3 बोटं, पतीलाही केली मारहाण) त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेने तो नंबर ब्लॉक केला. पण सचिन इतर नंबरवरून फोन करून शिवीगाळ करू लागला. त्यामुळे अखेरीस या महिलेनं क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सचिन दाभाडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.