औरंगाबाद, 25 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वयस्कर लोकांमध्ये आढळून येणारा हा आजार आता पालकांची चिंता वाढवत आहे. शहरात आढळलेल्या एकूण मधुमेही रुग्णांच्या 10 टक्के रुग्ण हे दीड ते 14 वर्ष वयोगटातील आढळून येत आहे. तसेच हे प्रमाण दर वर्षी 3 टक्क्यांनी वाढत असल्याचं बालरोग तज्ञ संघटनेच्या सचिव अंतरग्रंथी तज्ञ संध्या कोंडपल्ले यांनी सांगितलं. यामुळे लहान मुलांमध्येही मधुमेह सारखा आजार आढळत असल्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मधुमेहाचे टाइप-1 आणि टाइप-2 असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारचे मधुमेह शरीराचे नुकसान करतात. पहिला मधुमेह असतो तो टाइप - 1 मधुमेहामध्ये, स्वादुपिंड इन्शुलिन अजिबात तयार करत नाही. यामध्ये लहान मुलांचा समावेश अधिक दिसून येतो. तर टाईप -2 मधुमेहामध्ये स्वादुपिंड कमी इन्शुलिन तयार करतो. यामध्ये मधुमेहासाठी बदललेली जीवनशैली व्यायामाचा अभाव ताणतणाव आणि आहारातील कमतरता या प्रमुख गोष्टी दिसून येत आहेत, असंही संध्या कोंडपल्ले यांनी सांगितलं.
दरवर्षी 3 टक्क्याने होते वाढ
लहान मुलांमध्ये सर्वाधिक मधुमेह हा आजार सुरुवातीला इन्शुलिनचे प्रमाण कमी असल्याने आढळून येत असतो. दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये हा आजार वाढताना दिसून येत आहे. दरवर्षी या मधुमेह आजाराच्या रुग्णांमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मधुमेह आजाराची लक्षणे सुरुवातीला किडनी निकामी होणे किंवा किडनीवर परिणाम होणे. वारंवार लघवी होणे व रात्रीस उठायला लागणे. पोटात दुखणे व तळपायाची आग होणे. दृष्टी कमी होणे. जखम लवकर भरून न येणे किंवा त्वचेवर पुरळ येणे. हातावर मुंग्या येणे बधिरता चक्कर येणे निरुत्साह आढळून येतो. मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video मधुमेह आजार होण्याची कारणे लहान मुलांना हा आजार होतो त्यावेळेस मुलं कमी जेवण किंवा अति जेवण, जेवणामध्ये जंक फूड झालेला अतिक्रमण, मुलांचं एका ठिकाणी बसून राहणं, मुलं पूर्वीसारखं मैदानी खेळ खेळत नाहीत इत्यादी कारण बहुतांश यामध्ये दिसून येत आहेत. काय काळजी घेणार? लहान मुलांना लहानपणापासूनच सकस आहार, प्रोटीन, वेळोवेळी व्यायाम, ताजी फळ, सलार्ड, पुरेसं पाणी पिणे शिकवणे इत्यादी गोष्टी केल्यास तर आपल्याला हे टाळता येऊ शकतं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘गोड’ बातमी, औरंगाबादच्या डॉक्टरांचं औषध ठरणार वरदान!
मुलांमध्ये आजार किंवा असे लक्षणे दिसत असेल तर तुम्ही इकडे तिकडे बाहेर वेळ घालवण्यापेक्षा अंतरग्रंथी तज्ञ व बालरोग तज्ञांशी संपर्क साधून योग्य ते उपचार पद्धती सुरू केलेतर यामध्ये अडचणी येणार नाही. यातून बाहेर निघणे शक्य होईल यामुळे पालकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असं संध्या कोंडपल्ले सांगतात