जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी

एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असं वातावरण आहे.

एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असं वातावरण आहे.

एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असं वातावरण आहे.

  • -MIN READ Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली.  यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघालं आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असं वातावरण आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड पाऊस झाला, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आज ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झालं. पण ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला. ‘एकूण काय, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत असतं. अशावेळी शेतकऱ्यांना उघड्यावर पडू द्यायचं नसतं. आता नुसती घोषणाची अतिवृष्टी सुरू आहे.  या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. फक्त उत्सव साजरे करत आहे. मी उत्सव साजरे करा असं म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. हे सरकार अपयशी ठरत आहे’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली. (CM च्या पक्षातील नेताच म्हणतो, ‘एकनाथ शिंदेंचा होणार रामदास आठवले’, शिवसेनेचा खुलासा) जर हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही, असं हे सरकार म्हणतंय म्हणून प्रतिकात्मक ही भेट आहे. खरंकाय आणि खोटं काय हे सरकारला कळू द्या. रेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. जो शिधा सरकार वाटत आहे, ते धान्य हे शेतकऱ्यांकडूनच आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे, 50 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. (‘शिंदे गटातील 22 आमदार नाराज, भाजपात विलीन होणार’, शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट) आम्ही शेतकऱ्यांच्यासोबत आहोत, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत. काळजी करू नका, धीर सोडू नका. मनात आत्महत्येचा विचार आणू नका. आता शेतकरी म्हणून एक व्हा. मला आसूड भेट दिलाय, पण हा आसूड सरकारवर ओढला पाहिजे, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं. मी २ तासामध्ये दौरा करणार अशी टीका करत आहे. अरे ज्यांना घरामध्ये सर्व काही देऊन ते दुसरीकडे फिरत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या घरातील दु:ख काय कळणार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकाराला टोला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात